धक्कादायक..आठ वर्षांपासून नातीवर अत्याचार; वडिलाविरुद्ध विवाहित मुलीची तक्रार
By विलास जळकोटकर | Published: November 30, 2023 05:17 PM2023-11-30T17:17:58+5:302023-11-30T17:18:44+5:30
पिडिता मनोरुग्ण बनली, आईनं ठाण्यात मांडली व्यथा.
सोलापूर : शाळेच्या निमित्तानं माहेरी ठेवलेल्या नातीवर अतिप्रसंग केल्याची तक्रार विवाहित मुलीनं आपल्या वडिलांच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिली आहे. हा धक्कादायक प्रकार शहरातल्या एका परिसरात २०१५ ते २०२२ या आठ वर्षात अनेकदा अशी घटना घडल्याचे पिडितेने सांगितली असून, यामुळे आपली मुलगी मनोरुग्ण बनल्याची व्यथा फिर्यादीत व्यक्त केली आहे. या प्रकरणी भा. दं. वि. ३७६, बाल लैंगिक छळाचा (पोक्सो) गुन्हा नोंदला आहे.
यातील पिडितेच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी आपले पती, एक मुलगी व मुलगा असे जिल्ह्यातील एका गावात सासरी राहत होते. मोठी मुलगी चार-पाच वर्षाची असल्यापासून आई-वडिलांकडे राहून तेथेच शिक्षण घेत होती. ती इयत्ता ८ वी पर्यंत अभ्यासात कुशाग्र होती. इयत्ता ९ वीनंतर ती एकलकोंडी बनली. फिर्यादीच्या आईने फिर्यादीला बोलावून घेतले तेव्हा पिडित मुलीने तू गावाकडे जाऊ नको म्हणून भीती व्यक्त केली. तिच्या वागण्यातील बदलामुळे तिला फिर्यादीने गावाकडे नेले.
विश्वासात घेऊन तिला विचारणा केली असता तिने आजोबानं चार ते पाच वेळा केलल्या अत्याचाराबद्दल सांगितले. मुलीची बदनामी होईल म्हणून या प्रकाराबद्दल वाच्यता केली नाही. मुलीला स्वत:कडेच ठेऊन घेतले. गावाकडेच शाळेला घातले.
तिच्या वर्तनातील बदलामुळे डाॅक्टरांकडे दाखवले असता ती मानसिक रुग्ण बनल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यानंतर फिर्यादी कुटुंबासमवेत सोलापुरात येऊन स्वतंत्र राहू लागली. माहेरी फिर्यादीची आईही पतीच्या बाहेरख्याली वागण्याला कंटाळली होती. सतत भांडणे होत असत. म्हणून ती फिर्यादीकडे येत असे. फिर्यादीचे वडिल घरी येऊन भांडण करीत असतं. २०२२ मध्ये फिर्यादीच्या घरी पिडिता घरी एकटीच असताना तिच्यावर अत्याचाराची घटना घडली. पिडितेने आईला या प्रकाराची माहिती दिली. तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्याकडे निघाली असता पिडितेने ‘कोणाला सांगितले तर जीवाचे बरेवाईट करुन घेईन’ अशी धमकी दिल्याने केस केली नाही. अजुनही फिर्यादीचे वडील (पिडितेचे आजोबा) वाईट नजरेने लक्ष ठेवून असल्याने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार करावी लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आजोबाच्या कृत्यानं पिडिता मनोरुग्ण :
धक्कादायक घटनेने पिडिता मनोरुग्ण बनली आहे.बालवयात झालेल्या धक्कादायक घटनेमुळे आपली मुलगी मानसिक आजारानं मनोरुग्ण बनली. डॉक्टरांनी तसं निदान केलं आहे. याला वडीलच जबादार असल्याचे पिडितेची आईने फिर्यादीत म्हटले आहे.