मागासवर्गीय वस्तीत डबल काम दाखवून निधी उचलल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:08+5:302021-06-09T04:28:08+5:30

कुर्डूवाडी शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील जाधव यांचे घर ते करमाळा रोडपर्यंत रस्ता मजबुतीकरण व काँक्रिटीकरणाचे काम लोकशाहीर अण्णा ...

Complaint of raising funds by showing double work in backward class areas | मागासवर्गीय वस्तीत डबल काम दाखवून निधी उचलल्याची तक्रार

मागासवर्गीय वस्तीत डबल काम दाखवून निधी उचलल्याची तक्रार

Next

कुर्डूवाडी शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील जाधव यांचे घर ते करमाळा रोडपर्यंत रस्ता मजबुतीकरण व काँक्रिटीकरणाचे काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत नगरपालिकेने केले आहे. येेथे एकाच ठिकाणी मागासवर्गीय वस्ती असल्याचे बोगस दाखवून काम डबल केल्याच्या तक्रारीवरून नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील नगर अभियंत्यांच्या कार्यालयात शहरातील सर्वपक्षीय नेते जाब विचारण्यासाठी लेखी निवेदन सादर करत एकत्र आले. त्यावेळी नगर अभियंता व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

सोमवारी सकाळी ११ वाजता रिपाइंचे आकाश जगताप, जिल्हा उपाध्यक्ष अमरकुमार माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ताजी गवळी, युवा सेनेचे तालुका समन्वयक अतुल फरतडे, अल्पसंख्याक सेलचे वसीम मुलाणी, इर्शाद कुरेशी, बाळासाहेब शेडगे, गणेश समदाडे, इमरान शेख, जितेंद्र गायकवाड, सादिर चाऊस, अर्शद मुलाणी, कृष्णा अस्वरे, सागर व्हनमाणे आदी नेते व कार्यकर्ते नगरपालिका बांधकाम विभागात एकत्र जमले. तिथे उपस्थित असणाऱ्या नगर अभियंता मठपती यांना प्रश्नांची सरबती केली. यावर यात काही झाले नाही अशी उत्तरे नगर अभियंत्यांकडून मिळताच शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही काळ नगरपालिकेत तणाव निर्माण झाला. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि यावर पडदा टाकण्यात आला. याप्रकरणाची चर्चा मात्र दिवसभर शहरात सुरू होती.

----

काम नियमानुसारच झालेय : मठपती

कोरोनाची परिस्थिती असतानाही शहरातील १५ ते २० कार्यकर्ते माझ्या कार्यालयात सोमवारी सकाळी आले. त्यांनी कामाबाबत आरोप करीत गोंधळ केला. मी महिला असतानाही व अधिकारी असतानाही माझा कोणताही मान त्यांनी ठेवला नाही. याबाबत मला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. कामात कोणताही गोंधळ नाही, काम नियमानुसार आहे. पोलिसांत तक्रार अद्याप दिली नाही; परंतु देण्याच्या विचारात असल्याचे नगरपालिकेच्या नगर अभियंता वैशाली मठपती यांनी स्पष्ट केले.

----०७कुर्डूवाडी-गोंधळ

Web Title: Complaint of raising funds by showing double work in backward class areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.