कुर्डूवाडी पालिकेच्या कामात घोटाळ्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:30+5:302021-02-13T04:22:30+5:30

याबाबत अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्डूवाडी नगरपालिकेच्या विविध कामांतून दहा वर्षांच्या कालखंडामध्ये शासनाने दिलेल्या विविध विकासकामांचे अनुदान ...

Complaint of scam in the work of Kurduwadi Municipality | कुर्डूवाडी पालिकेच्या कामात घोटाळ्याची तक्रार

कुर्डूवाडी पालिकेच्या कामात घोटाळ्याची तक्रार

Next

याबाबत अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्डूवाडी नगरपालिकेच्या विविध कामांतून दहा वर्षांच्या कालखंडामध्ये शासनाने दिलेल्या विविध विकासकामांचे अनुदान व कर रूपाने गोळा झालेल्या पैशामध्ये बोगस कामे दाखवून हा घोटाळा साखळी पद्धतीने केला. त्याबाबत योग्य ते पुरावे गोळा करून या साखळी पद्धतीत सहभागी असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन तपास केला जावा म्हणून येथील पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यालाही दीड वर्ष लोटले. तरीही अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

सोलापूर, कोल्हापूर व राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे त्यांंनी याबाबत न्याय मागितला आहे. त्यालाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कोल्हापूर व सोलापूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषणही काही महिन्यांखाली करण्यात आले होते, असेही कांबळे यांनी सांगितले. याबाबत लवकरात लवकर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांंवर गुन्हा दाखल करावा व पुढील तपास व्हावा, अशीही त्यांनी या लेखी निवेदनात मागणी केली आहे.

------

भाऊसाहेब कांबळे यांच्या तक्रारीत कुर्डूवाडी नगर परिषदेतील विविध कामांचे वेगवेगळे विषय आहेत. संबंधित विषयावर वरिष्ठांचा कायदेशीर सल्ला घेणे गरजेचे असते. त्यात काय तथ्य आढळल्यास कायदेशीर बाबी पूर्ण करूनच तो विषय आमच्याकडे येत असतो. सध्या मी सुटीवर आहे. ड्यूटीवर हजर झाल्यानंतर पाहून त्यावर सविस्तर बोलणे उचित ठरेल.

-डॉ. विशाल हिरे,

उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा

Web Title: Complaint of scam in the work of Kurduwadi Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.