सोलापुरात नळाला आलेल्या गढूळ पाण्याची तक्रार पोहोचली ‘पीएमओ’त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:11 PM2019-04-01T13:11:02+5:302019-04-01T13:14:45+5:30
पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांपर्यंत ही तक्रार पोहोचल्यानंतर त्यांनी झोन कार्यालयाला कळवून गढूळ पाण्याचे कारण शोधण्याचे आदेश दिले.
सोलापूर : ऐन उन्हाच्या कडाक्यात शहरात सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असून विजापूर रोडवरील निर्मिती गणेश भागात गढूळ पाणी येत असल्याची तक्रार येथील नागरिकाने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. ही कसली स्मार्ट सिटी असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
सहा दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. तीन एप्रिलनंतर शहरात तीन दिवसाआड पाणी येईल, असे महापालिका सांगत आहे. विजापूर रोडवरील निर्मिती गणेश सोसायटीतील रहिवासी अमेय केत यांनी रविवारी पंतप्रधान कार्यालयाला एक टिष्ट्वट केले.
सहा दिवसानंतर बेटाईम रात्री सव्वाबाराला घाण पाणी येत आहे. ही असली कसली स्मार्ट सिटीसोलापूर? धरणात पाणी कमी आहे मान्य, पण पाणी तर देऊ नका. प्राथमिक गरजा पण नीट पूर्ण होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. या टिष्ट्वटसोबत त्यांनी घाण पाण्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. सोशल मीडियावर हे टिष्ट्वट व्हायरल झाले.
स्मार्ट सिटीच्या कामावर पुन्हा टीका होऊ लागली. पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांपर्यंत ही तक्रार पोहोचल्यानंतर त्यांनी झोन कार्यालयाला कळवून गढूळ पाण्याचे कारण शोधण्याचे आदेश दिले.
संबंधित भागात काही दिवसांपूर्वी पाईपलाईनचे, व्हॉल्व्हचे काम झाले होते. या कामात काही तांत्रिक त्रुटी राहिल्या असाव्यात. विभागीय कार्यालयातील अधिकाºयांना याबाबत तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी अहवाल येईल.
- व्यंकटेश चौबे
उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग
सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी आम्ही काटकसरीने पाणी वापरण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण गढूळ पाणीपुरवठा होणे हे नागरिकांच्या आरोग्याला बाधा आणणारे आहे. पाणीपुरवठा विभागाने वेळीच दखल घेणे गरजेचे होते. त्यांनी दखल न घेतल्याने पंतप्रधान कार्यालयाला टिष्ट्वट करावे लागले.
- अमेय केत
रहिवासी, निर्मिती गणेश, विजापूर रोड