स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या थेट राज्यपालांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:27 AM2021-08-18T04:27:53+5:302021-08-18T04:27:53+5:30
एमपीएससीवर कार्याचा भार बघता एमपीएससीची एकूण सदस्य संख्या १५ ते २० पर्यंत वाढविण्यात यावी, रखडलेले निकाल लवकरात लवकर जाहीर ...
एमपीएससीवर कार्याचा भार बघता एमपीएससीची एकूण सदस्य संख्या १५ ते २० पर्यंत वाढविण्यात यावी, रखडलेले निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, पोलीस भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविण्यात यावी, दोन वर्षांपासून रखडलेली शिक्षकपद भरती लवकरात लवकर राबवावी, शालेय व महाविद्यालयीन फी १५ टक्के कपात करण्यात यावी, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी धनगर व वंजारी या समाजांतील विध्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जागा वाढवून मिळाव्यात.
सन २०२०मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीत धनगर समाजाला दोन जागा व वंजारी समाजाला एकही जागा मिळाली नाही, अशा व्यथा राज्यपालांकडे मांडण्यात आल्या. यावेळी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी येथील शर्मिला येवले उपस्थित होत्या.
........
फोटो ओळ
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देताना महेश घरबुडे व शर्मिला येवले.
......
फोटो १७ करमाळा२