आठ दिवसांत कुरनूर धरणाच्या आवश्यक बाबींची पूर्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:15 AM2021-07-02T04:15:55+5:302021-07-02T04:15:55+5:30

धरणावरील संरक्षक कठडे तुटले असून, याठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने कठडे बांधले जाणार आहेत. सोमवारी धरणावरील रस्त्यावर पडलेल्या भेगा, सौरदिवे ...

Completion of essentials of Kurnoor Dam in eight days | आठ दिवसांत कुरनूर धरणाच्या आवश्यक बाबींची पूर्तता

आठ दिवसांत कुरनूर धरणाच्या आवश्यक बाबींची पूर्तता

Next

धरणावरील संरक्षक कठडे तुटले असून, याठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने कठडे बांधले जाणार आहेत. सोमवारी धरणावरील रस्त्यावर पडलेल्या भेगा, सौरदिवे व पथदिव्यांची झालेली चोरी, तुटलेले संरक्षक कठडे, स्वयंचलित दरवाजांची दुरुस्ती याविषयी ‘लोकमत’मधून वृत्तमालिका प्रकाशित करण्यात आली होती.

मंगळवारी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधित विभागाचे अधिकारी थेट कुरनूर धरणावर पोहोचले व त्यांनी पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता मोहन जाधवर, उपअभियंता प्रकाश बाबा, शाखा अभियंता रोहित मनलोर, बीटधारक एन.व्ही. उदंडे, मारुती बावडे उपस्थित होते.

---

कामाला हवी गती

धरणावरील संरक्षक कठडे तुटले असून, याठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने कठडे बांधले जाणार आहेत. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कुरनूर धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्यावेळी तालुक्यातील अनेक गावांत पूर आला होता व नुकसान झाले होते. पावसाने वेळीच विश्रांती घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता. आता पावसाळा सुरू झाला असून, आवश्यक बाबींची लवकर पूर्तता करण्याचे आव्हान संबंधित विभागासमोर आहे.

----

उशिरा जाग आली

धरणाची दुरवस्था झाली आहे. त्यावर ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी धरणावर पोहोचले. मात्र, पावसाळ्याच्या प्रारंभी संबंधित विभागाचे अधिकारी आले. संबंधित विभागाला उशिरा जाग आली.

-सिद्धार्थ गायकवाड, माजी उपसभापती, पं.स. अक्कलकोट

----

फोटो : ३० चपळगाव

कुरनूर धरणाची पाहणी करताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी

300621\0700img-20210630-wa0022.jpg

कुरनूर धरणाची पाहणी करताना अधिक्षक अभियंता धीरज साळे, मोहन जाधवर,प्रकाश बाबा,रोहित मनलोर,एन.व्ही.उदंडे...

Web Title: Completion of essentials of Kurnoor Dam in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.