सोलापूर जिल्ह्यात जययुक्त अभियानाची साडे सात हजार कामे पुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:31 PM2018-09-15T15:31:35+5:302018-09-15T15:36:36+5:30
७५ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च : २ हजार ७०० कामे प्रगतीपथावर
सोलापूर : टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांच्या माध्यामातुन ७ हजार ३५३ कामे पुर्ण करण्यात आली. तर २ हजार ७६५ कामे प्रगतीपथावर असल्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानासाठी विविध विभागाकडील विविध योजनांतर्गत उपलब्ध निधीची एकत्रित सांगड घालून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघु सिंचन, जलसंपदा, जिल्हा परिषदेकडील कृषी व लघुसिंचन, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, स्वच्छता अशा जिल्हास्तरीय यंत्रणामध्ये समन्वय राखून हे अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात चालु असलेली कामे
- कंपार्टमेंट बंडिगची २९८ कामे, शेततळे- वनतळे ११६, माती नालाबांध १०, सिमेंट बंधारा १११, सिमेंट बंधारा दुरुस्ती ७, पाझर तलाव दुरुस्ती १०८, के.टीवेअर दुरुस्ती व नवीन बर्गे बसविणे ५८, विहीर बोअरवेल पुनर्भरण १२१६, रिचार्ज शाफट २५, गाळ काढणे शासकीय २५७, गाळ काढणे लोकसहभाग ५७, वृक्ष लागवड ७, ठिबक सिंचन १९८, गाव तलाव दुरुस्ती १३, इतर कामे २७९ अशा प्रकारची एकुण २ हजार ७६५ कामे जिल्ह्यात सुरु आहेत.