सोलापूरात संगणकीकृत सातबाराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:44 PM2018-05-04T15:44:19+5:302018-05-04T15:44:19+5:30
आॅनलाईन सातबारा योजनेमुळे याबाबत होणाºया गैरव्यवहाराला आळा बसेल, असा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला.
सोलापूर : संगणकाच्या मदतीने आॅनलाईन सातबारा मिळू लागल्याने शेतकºयांना आणि इतरांना झटपट सेवा मिळेल. आॅनलाईन सातबारा योजनेमुळे याबाबत होणाºया गैरव्यवहाराला आळा बसेल, असा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते संगणकीकृत सातबाराचे वितरण झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तलाठी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कामात गतिमानता तर येतेच त्याचबरोबर मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे गैरव्यवहारालाही आळा बसतो. शासनाने शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले आहे.
शासनाच्या सर्व सेवा आॅनलाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या शेतकºयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते संगणकीकृत सातबाराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी संगणकीकृत सातबारापाठीमागील भूमिका स्पष्ट केली. तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, शिवाजी जगताप, ज्योती पाटील, शमा ढोक, प्रवीण गायकवाड, मारुती वीरकर, सचिन ढोले आदी उपस्थित होते.