विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:03 AM2021-02-20T05:03:11+5:302021-02-20T05:03:11+5:30

मोडनिंब : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभीयानांतर्गत १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान चाललेल्या चालू ...

Concluding Road Safety Campaign at Vitthalrao Shinde Factory | विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता

विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता

Next

मोडनिंब : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभीयानांतर्गत १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान चाललेल्या चालू गळीत हंगामात विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर आणि करकंब यूनिट २ च्या वतीने बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर ट्रेलर या सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

स्टेट हायवेरोडवर उसाची वाहने ट्राफिक मध्ये अडकल्यास सुरक्षा कर्मचारी वाहतूक सुरळीत कसे करतात याबाबत मार्गदर्शन केले. सोलापूरचे वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस, आर टी ओ कार्यालय टेंभुर्णी पोलीस ठाणे, टेभुर्णी, कुर्डूवाड़ी, करकंब, मोडनिंबचे पोलीस यांनी या सप्ताहात योगदान दिले.

रस्ता सुरक्षा अभियानासाठी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक एस. आर. यादव, भोगाडे, चीफ केमिस्ट यलपले, मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थिटे, शेती अधिकारी सुनील बंडगर, सिव्हिल इंजीनियर सुनील शिंदे, रस्ता अभियान मोहीम विशेष राबविणारे सुरक्षा अधिकारी एफ़. एम. दुंगे, उस पुरवठा अधिकारी महेश चंदनकर, केनयार्ड सूपरवायझर गायकवाड, सुरक्षा कर्मचारी बी. डी. शिंदे, जी. एन. शिंदे, एस. जी. थोरात, टी. एम. मिस्किन, जी. एस. सावंत यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Concluding Road Safety Campaign at Vitthalrao Shinde Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.