कुर्मदास कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:59+5:302021-03-08T04:21:59+5:30

यावेळी बाॅयलर सुपरवायझर शंकर जगन्नाथ लोकरे व त्यांच्या पत्नी वंदना लोकरे या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. ...

Conclusion of the crushing season of Kurmadas factory | कुर्मदास कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

कुर्मदास कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

Next

यावेळी बाॅयलर सुपरवायझर शंकर जगन्नाथ लोकरे व त्यांच्या पत्नी वंदना लोकरे या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.

संचालक दादासाहेब साठे म्हणाले, चालू गळीत हंगामात कुर्मदास सहकारी साखर कारखान्याने १ लाख ३३ हजार ९०० मे. टन ऊस गाळप केले आहे. या हंगामात कारखान्यास कोणत्याही बँकेने कर्ज दिले नाही. त्यामुळे संचालकांची मालमत्ता गहाण ठेवून कारखाना यशस्वीपणे चालविला आहे. तसेच कारखान्यामधील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग यांच्यामुळेच हे गाळप शक्य झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखान्याचे गाळप केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक बी. डी. पाटील, व्हाइस चेअरमन शिरीषकुमार पाटील, संचालक भालचंद्र पाटील, अरुण लटके, भारत पाटील, विठ्ठल शिंदे, सुधीर पाटील, ज्ञानदेव उबाळे, हरिदास खताळ, राहुल पाटील, पुंंडलिक साळवे, प्रताप पाटील, रोहिदास कदम, शशिकांत देशमुख, अजिनाथ माळी, शिवाजी पाटील, संजय मुरलीधर इंगळे, बाळू व्यवहारे, कार्यकारी संचालक बी. डी. पवार, सचिन पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, कारखाना कर्मचारी, ऊस उत्पादक उपस्थित होते.

Web Title: Conclusion of the crushing season of Kurmadas factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.