रिकव्हरीबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:27+5:302020-12-12T04:38:27+5:30

टेंभुर्णी-कुर्डुवाडीरोडवरील बायपास चौकात दुपारी शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात जयसिंग ढवळे, विठ्ठल ...

Confusion in the minds of farmers about recovery | रिकव्हरीबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम

रिकव्हरीबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम

Next

टेंभुर्णी-कुर्डुवाडीरोडवरील बायपास चौकात दुपारी शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या आंदोलनात जयसिंग ढवळे, विठ्ठल मस्के, नारायण गायकवाड, सुरेश पाटील, तानाजी जगताप, प्रशांत खुळे, दीपाली डेरे, निवृत्ती तांबे, अमोल जगदाळे, विजय पवार, सुधीर महाडिक, गिरीश ताबे, सुभाष इंदलकर, रामभाऊ टकले, राजू पाटील, भय्या देवडकर, विजय खुपसे, कल्याण गवळी, विशाल उकिरडे, गणेश ढोबळे, विठ्ठल कानगुडे, अतुल राऊत यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

अतुल खुपसे म्हणाले, कोणत्या साखर कारखाने किती गाळप केले हे महत्त्वाचे नाही, तर शेतकऱ्यांच्या पदरात किती पडले हे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार एकच असून, ते मिळून रिकव्हरी चोरतात. शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढतात अशा कारखानदारांवर कारवाई झाली पाहिजे. १६ तारखेपर्यंत एफआरपी एकरकमी दिली नाही, तर १७ तारखेपासून जिल्ह्यातील साखर कारखाने बंद पाडण्याचे आंदोलन छेडले जाईल, असे सांगितले.

तासभार झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

फोटो

११टेंभुर्णी रास्ता रोको

ओळी

टेंभुर्णी बायपासरोडवर रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी बोलताना संजय कोकाटे. समोर आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी.

Web Title: Confusion in the minds of farmers about recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.