ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसलेंवर कौतुकाचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:56+5:302020-12-05T04:47:56+5:30
बार्शीतील अलीपूर रोड भागातील सेवानिवृत्त शिक्षक महादेव डिसले यांचे घर केंद्रबिंदू झाले आहे. गुरुवारी रात्रीपासून त्यांचे कौतुक करण्यासाठी नागरिकांनी ...
बार्शीतील अलीपूर रोड भागातील सेवानिवृत्त शिक्षक महादेव डिसले यांचे घर केंद्रबिंदू झाले आहे. गुरुवारी रात्रीपासून त्यांचे कौतुक करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राजेंद्र राऊत, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पवार, सभापती अनिल डिसले, निरंजन भूमकर, विक्रम सावळे, मंगेश चव्हाण, सुप्रिया गुंड, अविनाश मांजरे, गटविकास अधिकारी शेखर सावंत आदी उपस्थित होते.
-----
शासन करणार सन्मान: पालकमंत्री
गुरुजींना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे देश, राज्य व जिल्ह्याचे भाग्य आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असून, ते नवीन पद्धत राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. शासनाच्या वतीने त्यांची नक्कीच दखल घेतली जाईल. त्यांच्या उपक्रमाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहील. त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाला निधी देखील उपलब्ध करून देऊ. जिल्हा परिषदेच्या शाळांना वैभव प्राप्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. लवकरच शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असेही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले.