लाेकसभेच्या उमेदवारीवरुन काॅंग्रेस-भाजप शहराध्यक्ष भिडले

By राकेश कदम | Published: August 17, 2023 11:27 AM2023-08-17T11:27:41+5:302023-08-17T11:28:35+5:30

दाेघांनी काढली एकमेकांची हिंमत : निष्ठावंतांना तिकिट देण्याचा विषय

Congress-BJP city president clashed over Lok Sabha candidature in Solapur | लाेकसभेच्या उमेदवारीवरुन काॅंग्रेस-भाजप शहराध्यक्ष भिडले

लाेकसभेच्या उमेदवारीवरुन काॅंग्रेस-भाजप शहराध्यक्ष भिडले

googlenewsNext

सोलापूर : भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला साेलापूर लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असे आव्हान काॅंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी गुरुवारी दिले. भाजपमध्ये हिंमत आहेच. काॅंग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी शिंदे कुटुंबांच्या बाहेरील उमेदवार देउन दाखावावा, असे प्रत्यूत्तर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिले.

साेलापूर लाेकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी द्यावी असा ठराव नुकताच काॅंग्रेसच्या बैठकीत झाला हाेता. त्यामुळे साेलापुरात आमदार प्रणिती शिंदे याच काॅंग्रेसच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली. यावर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी बुधवारी टीका केली हाेती. या टिकेला काॅंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी जाेरदार उत्तर दिले. नराेटे म्हणाले हाेते की, भाजपची नाैका लवकरच बुडणार आहे. त्यामुळे ते काॅंग्रेसच्या उमेदवाराला घाबरुन प्रतिक्रिया देत आहेत. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी एका सच्चा कार्यकर्त्याला साेलापुरात उमेदवारी द्यावी. भाजपचे लाेक बाहेरुन उमेदवार आणतात. जातीचे बोगस दाखले काढणाऱ्या लाेकांना उमेदवारी देतात, असे नरोटे म्हणाले होते.

या टिकेवर नरेंद्र काळे यांनी गुरुवारी पुन्हा उत्तर दिले. काळे म्हणाले, आमच्यामध्ये हिंमत आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काॅंग्रेस हा केवळ सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा पक्ष झाला आहे. या पक्षात शिंदे कुटुंबातील व्यक्ती साेडून इतर काेणालाही आमदार वा खासदार हाेता येत नाही. साेलापूर जिल्ह्यात काॅंग्रेसचा एकमेव आमदार आहे आणि ताे सुध्दा शिंदे यांच्या कुटुंबातील आहे. बाहेरच्या माणसाला ते निवडून येउ देत नाहीत. काॅंग्रेसच्या नेत्यांनी या सर्व गाेष्टींचा विचार करुन आमच्यावर टीका करावी असेही काळे म्हणाले.

Web Title: Congress-BJP city president clashed over Lok Sabha candidature in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.