सोलापूर मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखली, तौफिक हत्तुरे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:43 PM2018-04-07T12:43:13+5:302018-04-07T12:43:13+5:30

विरोधकांनी ही जागा खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण जागा कायम राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. 

Congress defeats Solapur municipal by-election, Taufiq Hatture wins | सोलापूर मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखली, तौफिक हत्तुरे विजयी

सोलापूर मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखली, तौफिक हत्तुरे विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देतौफिक हत्तुरे यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केलामतमोजणीअगोदर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी तयारीची पाहणी केली

 एमआयएमच्या उमेदवार शेख यांचा पराभव
सोलापूर: प्रभाग १४ क च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तौफिक हत्तुरे १६0४ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती, विरोधकांनी ही जागा खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण जागा कायम राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. 
पोटनिवडणुकीत उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. तौफिक हत्तुरे (काँग्रेस): ४९४४, रणजित दवेवाले (भाजप): १९२१, सद्दाम शाब्दी (राष्ट्रवादी काँग्रेस): ९00, बापू ढगे (शिवसेना): ८५३, नलिनी कलबुर्गी (माकप): ११६९, पीरअहमद शेख (एमआयएम): ३३४0, वसीम सालार (अपक्ष): ४९९, कैय्युम सिद्धकी (मनसे)१५, म. गौस कुरेशी (हिंदुस्तान जनता पार्टी): ३0. नोटा: ५१. शनिवारी सकाळी १0 वा. कोटणीस हॉलमध्ये मतमोजणी सुरू झाली. टपाली एकही मतदान नव्हते. पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार हत्तुरे यांनी १८0 मते मिळवत १0६ मतांची आघाडी घेतली. भाजपचे दववाले यांना केवळ ९ तर सेनेचे ढगे यांना २५, एमआयएमचे शेख यांना ७४, माकपच्या कलबुर्गी यांना १९ तर राष्ट्रवादीचे शाब्दी यांना केवळ ८ मते मिळाली. पाच फेºयात मतमोजणी झाली. प्रत्येक फेरीनिहाय ८ बुथ मोजणीसाठी घेण्यात आले. दुसºया फेरीत काँग्रेसच्या उमेदवाराने १११७ तर तिसºया फेरीत १४0४ मतांनी आघाडी घेतली. 
पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखण्यात यश मिळविले. रफिक हत्तुरे यांचे निधन झाल्यावर काँग्रेसने त्यांचे बंधू तौफिक हत्तुरे यांना उमेदवारी दिली.  मनपाच्या सार्वत्रिक निवडणकुीत प्रभाग १४ मधील तीन जागांवर एमआयएमच्या उमेदवार विजयी झाले तर फक्त १४ क ही जागा काँग्रेसने जिंकली होती. त्यामुळे एमआयएमने ही जागा खेचण्यासाठी शक्ती पणाला लावली होती. तर या चुरशीचा फायदा उचलण्यासाठी भाजप व सेनेनेही चांगली तयारी केली होती. खरी लढत काँग्रेस व एमआयएमच्या उमेदवारात झाल्याचे मतदानावरून दिसून आले. भाजपवगळता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपच्या उमेदवारांना डिपॉझीट वाचवता आले नाही. 

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
तौफिक हत्तुरे यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मतमोजणी शांततेत व वेळेवर पार पडली. मतमोजणीअगोदर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी तयारीची पाहणी केली. सहायक निवडणुक अधिकारी अरुणा गायकवाड यांनी फेरीनिहाय निकाल घोषीत केले. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: Congress defeats Solapur municipal by-election, Taufiq Hatture wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.