भाजपविरोधात आंदोलन करणाºया नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा काँग्रेसला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:16 PM2019-07-08T12:16:24+5:302019-07-08T12:59:13+5:30
राजकीय; शहर उत्तर’च्या राजकारणावर परिणाम होणार
सोलापूर : सत्ताधारी भाजपच्या विरोधात आंदोलन करुन महापालिकेच्या सभागृहाला टाळे ठोकणाºया काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सोमवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीमाना दिला. गटबाजीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे त्यांनी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना सांगितले. फुलारे यांच्या राजीनाम्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे.
मनपाचे अंदाजपत्रक वेळेवर होत नाही, नगरसेवकांना भांडवली कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप करुन नगरसेविका फुलारे यांनी सर्वसाधारण सभेच्या दिवशी महापालिकेच्या सभागृहाला टाळे ठोकले होते. यावेळी सभागृहात काही नगरसेवक अधिकारी होते. याबद्दल फुलारे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती.
काँग्रेसच्या नगरसेवकांनी या आंदोलनात साथ देण्याऐवजी थेट कारवाईला करायला सांगितल्याने फुलारे संतापल्या होत्या. त्यांनी काँग्रेसच्या गटनेत्यावर टीका केली होती. त्यामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी श्रीदेवी फुलारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीशीला उत्तर देताना फुलारे यांनी थेट काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आंदोलन करणाºया नगरसेवकांना मदत करण्याऐवजी पक्षात गटबाजी केली जात आहे. त्यामुळे मी पक्ष सोडत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.