ज्योतिषशास्त्रातूनच वास्तुशास्त्राची निर्मिती : तराणेकर
By admin | Published: May 14, 2014 01:32 AM2014-05-14T01:32:14+5:302014-05-14T01:32:14+5:30
श्रोत्यांची उपस्थिती : श्रीराम कृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यान
सोलापूर : वेद काळात तक्षक अर्थात इंजिनिअर होते़ एखादा राजवाडा, मोठ्या इमारती उभारल्या जायच्या त्या तक्षकच्या सल्ल्याने़ ते ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यायचे़ आज इमारत उभारताना इंजिनिअरचा आधार घेताल जातो़ वास्तूंचा इतिहास उलगडता ज्योतिषशास्त्रातून वास्तुशास्त्रातून झाल्याचे निदर्शनास येते, असे प्रतिपादन इंदौरचे डॉ़ बाबामहाराज तराणेकर यांनी केले़ श्रीराम कृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हि़ ने़ वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात मंगळवारी सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते़ ‘वास्तूंचे ऐश्वर्य’ विषयावर बोलताना तराणेकर यांनी वरील विधान केले़ प्रास्ताविक गणेशलाल मानधनिया यांनी केले़ याप्रसंगी श्रीराम कृष्ण सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी जवाहर जाजू, श्यामसुंदर बलदवा, नारायणराव रघोजी, मधुसूदन कालाणी, राजाराम जखोटिया, प्रवीण चंडक, संजय कुसूरकर, दत्तात्रय दिवटे, विष्णूदास दिवटे, विष्णूदास तापडिया, गोपाळ सारडा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खुशालचंद बाहेती, वल्लभदास गोयदानी, जयनारायण भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ तराणेकर पुढे म्हणाले की, वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवावा की नको, हा अनेकांच्या मनातील प्रश्न असला तरी वास्तुशास्त्र हा ज्योतिषशास्त्रावर आधारलेला आहे़ राजासमरागंध दोष गं्रथात वास्तुशास्त्र मांडले आहे़ १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंजिनिअर आला़ पण सर्वत्र वास्तुशास्त्रच पाळला गेला़ कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणायला हवे़ योग्य ठिकाणी वास्तू उभारली जावी म्हणून पूर्वी १२-१२ तास यज्ञ चालायचे़ यातूनच स्थापत्यशास्त्र पुढे आले़