करमाळ्यातील गाळ्यांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:06+5:302021-07-07T04:28:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क करमाळा : जनतेला सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून करमाळ्यात आमदारांच्या नावाने गाळे उभारण्यात आले. मात्र उद‌्घाटनापूर्वीच हे ...

Construction of Karmalya Cheeks | करमाळ्यातील गाळ्यांचे बांधकाम

करमाळ्यातील गाळ्यांचे बांधकाम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

करमाळा : जनतेला सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून करमाळ्यात आमदारांच्या नावाने गाळे उभारण्यात आले. मात्र उद‌्घाटनापूर्वीच हे गाळे निकृष्ट बांधले गेल्याचा आरोप विरोधी गटाचे नगरसेवक सचिन घोलप यांनी केला आहे. गाळेधारकांची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी बांधलेल्या गाळ्यांची त्यांनी पाहणी केली. बांधकाम करून अवघे चार महिने होण्याच्या आतच बांधकामाला चिरा गेल्याचे निदर्शनास आले आहे. यासोबतच बांधकामाचे छत गळत आहे. पावसाचे पाणी थेट गाळ्यात पडत आहे.

यावेळी घोलप म्हणाले, माजी आमदार यांचे नाव या नवीन गाळ्यांना दिले आहे. इतक्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम कोठेच झालेले नाही. ज्यांनी गाळे घेतले आहेत त्यांनी तीन लाख रुपये आगाऊ रक्कम दिली आहे. काहींनी घरातील सोने गहाण ठेवून या गाळ्याचे डिपाॅझिट भरले आहे. हे गाळे चालू होण्याआधीच त्यांची दुरवस्था झाली आहे. गाळेधारकांची ही सरळ फसवणूक आहे. जनता अशांना कधीच स्वीकारणार नाही. या गाळ्यासमोर गटाराचे स्वरूप आले आहे. गुंतवणूकदारांना चांगले गाळे मिळावेत म्हणून प्रयत्न राहतील, असे अशी ग्वाही घोलप यांनी दिली.

----

करमाळा नगर परिषदेला विकासकामांसाठी निधीची उपलब्धता करून देणे ही माझी जबाबदारी होती. करण्यात येत असलेले काम निकृष्ट, आकृष्ट, की उत्कृष्ट होत आहे हे पाहण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. हे बांधकाम सुरू असताना नगरसेवक काय करीत होते? तसेच ३० टक्के रक्कम संबंधित ठेकेदाराची अनामत म्हणून नगर परिषद ठेवून घेते.

- वैभवराजे जगताप

नगराध्यक्ष, करमाळा

-----

फोटो : ०६ करमाळा

करमाळ्यातील शाॅपिंग सेंटरच्या गाळ्यांची झालेली दुरवस्था.

Web Title: Construction of Karmalya Cheeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.