सोलापूरच्या गावठाणात बांधकाम; तर हद्दवाढीत खुल्या जागेच्या किंमती महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 03:12 PM2020-09-14T15:12:11+5:302020-09-14T15:14:51+5:30

रेडिरेकनरचा प्रभाव;  किरकोळ वाढ असली तरी किमतीवर होणार मोठा परिणाम; चार वर्षांनंतर दरात बदल

Construction in the village of Solapur; So open space prices are expensive | सोलापूरच्या गावठाणात बांधकाम; तर हद्दवाढीत खुल्या जागेच्या किंमती महाग

सोलापूरच्या गावठाणात बांधकाम; तर हद्दवाढीत खुल्या जागेच्या किंमती महाग

Next
ठळक मुद्दे कोरोना साथीमुळे महसुलात ६0 टक्के घट तर खरेदी-विक्रीच्या नोंदणीत ४0 टक्के घट झाली जंगम मालमत्ता खरेदी-विक्रीच्या मंदीमुळे शासनाने सन २0१६ ते २0१९ या काळात रेडिरेकनरमध्ये कोणतीही वाढ केली नव्हती.आत्तापर्यंत जुन्याच म्हणजे सन २0१६ च्या दराने आकारणी केली जात होती. पण आता शासनाने रेडिरेकनर दरवाढ जाहीर केली आहे

सोलापूर : राज्य शासनाने शनिवार दि. १२ सप्टेंबरपासून सोलापूर महापालिका क्षेत्रात रेडिरेकनर दरात ०.६२ टक्के वाढ केल्याने गावठाणातील बांधकाम तर हद्दवाढ भागातील खुल्या जागांच्या किमतीत चार वर्षांनंतर बदल झाला आहे. रेडिरेकनरची सरासरी दरवाढ किरकोळ वाटत असली तरी बांधकामे व खुल्या जागांच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. 

जंगम मालमत्ता खरेदी-विक्रीच्या मंदीमुळे शासनाने सन २0१६ ते २0१९ या काळात रेडिरेकनरमध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. त्यामुळे आत्तापर्यंत जुन्याच म्हणजे सन २0१६ च्या दराने आकारणी केली जात होती. पण आता शासनाने रेडिरेकनर दरवाढ जाहीर केली आहे. महापालिका क्षेत्रासाठी सरासरी 0.६२ टक्के इतकी वाढ झाली असे दाखविण्यात आले असले तरी शहरातील ५६ पेठा व हद्दवाढ भागातील बांधकाम व खुल्या जागांच्या किमतीवर मोठा फरक पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत शहरातून गेलेले महामार्ग, बाजारपेठेत झालेला बदल याचा विचार करून रेल्वेलाईन, मजरेवाडी, बाळे, लक्ष्मीपेठ, नेहरूनगर, बुधवारपेठ परिसरातील खुल्या जागांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी दर जास्त होते पण त्या ठिकाणी जागांना मागणी आलेली नव्हती अशा ठिकाणचे दर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. मजल्यावरील आॅफिस व दुकानांच्या दरात थोडी कपात केलेली तर काही ठिकाणी वाढ केलेली दिसत आहे.

महानगरपालिका क्षेत्रात मूल्यांकनासाठी बांधकाम वर्गीकरणानुसार सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आता पुढीलप्रमाणे दर ठरविण्यात आले आहेत. कंसातील आकडे जुने दर दर्शवितात. मनपा क्षेत्र आरसीसी बांधकाम: २१ हजार ७८0 रुपये (१९ हजार ८00), पक्के बांधकाम: १७ हजार ६७२ (१६हजार ८३0), अर्धे पक्के बांधकाम: १२ हजार ४७४ (११ हजार ८८0), कच्चे बांधकाम: ८ हजार ४ (६ हजार ९३0). ग्रामीण भागाचे दर, आरसीसी: १७ हजार ४२४ (१५ हजार ८४0), पक्के बांधकाम: १४ हजार १३७ (१३ हजार ४६४), अर्धे पक्के बांधकाम: ९ हजार ९७९ (९ हजार ५0४), कच्चे बांधकाम: ६ हजार ४0३(५ हजार ४४४). वास्तविक बांधकामाचा दर वाढविण्यात आला तरी सोलापुरात इतका खर्च येत नाही असे काही बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. रडिरेकनरचे दर वाढल्याने आता बांधकाम परवान्यालाही जादा पैसे मोजावे लागणार      आहेत. 

कोरोना काळात वाढ चुकीची
शासनाने गेल्या चार वर्षांत रेडिरेकनरचे दर वाढविले नव्हते. या वर्षात कोरोना साथीमुळे महसुलात ६0 टक्के घट तर खरेदी-विक्रीच्या नोंदणीत ४0 टक्के घट झाली आहे. त्यामुळेच मुद्रांक सवलत देण्यात आली होती. आता आर्थिक वर्षाला अवघे पाच महिने राहिलेले असताना व साथीमुळे बाजारात व्यवहार मंदावले असताना चुकीच्यावेळी रेडिरेकनरमध्ये वाढ केल्याचे मत शहर मुद्रांक विक्रेते प्रताप सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर आता शहरातील प्रमुख पेठातील जागेच्या रेडिरेकनरमध्ये चौरस मीटरला कशी वाढ करण्यात आली आहे हे बाजूच्या तक्त्यावरून दिसून येणार आहे.

Web Title: Construction in the village of Solapur; So open space prices are expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.