ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये, जबाबदारी...

By Admin | Published: December 23, 2014 10:40 PM2014-12-23T22:40:22+5:302014-12-23T23:54:00+5:30

आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनीच खरेदी करताना जागरुक राहून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे

Consumer Rights, Duties, Responsibilities ... | ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये, जबाबदारी...

ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये, जबाबदारी...

googlenewsNext


पूर्वी विनिमयासाठी वस्तूच्या बदल्यात वस्तूचा वापर करण्यात येत असे. कालांतराने वस्तू खरेदीचा मोबदला म्हणून पैशाचा वापर होऊ लागला. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. प्रतिवर्षी २४ डिसेंबर रोजी ग्राहकदिन साजरा केला जातो. त्यानिमित्त..

भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीस विशेष महत्त्व आहे. आता दिवाळी, मोहरम व ख्रिसमस या महत्त्वाच्या सणासुदीच्या दिवसात विशेषत: मिठाई, ड्रायफ्रूटस्, सजावटीच्या, शोभेच्या वस्तू, फटाके आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या काळात आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनीच खरेदी करताना जागरुक राहून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना अनेक प्रकारचे हक्क असले, तरी त्याची जाणीव असणे आवश्यक आहे.
सुरक्षिततेचा हक्क
जीवित किंवा मालमत्तेला धोकादायक अशा वस्तूंच्या वापरापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क ग्राहकाला आहे. उदा. भेसळयुक्त पदार्थ, बनावट, मुदतबाह्य झालेली औषधे, बनावट विद्युत उपकरणे आदी.
माहिती मिळविण्याचा हक्क
आपण जी वस्तू खरेदी करतो, तिच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा ग्राहकाला हक्क आहे. उदा. खरेदी करण्यात येणाऱ्या मालाची प्रत, वजन, शुध्दता, तीव्रता, उत्पादकाचे नाव, उत्पादनाचा महिना, वाटपाची मुदत आदी.
निवडीचा हक्क
स्पर्धेच्या युगात योग्य किमतीत आपल्या वस्तूची निवड करण्याचा हक्क ग्राहकाला आहे. ग्राहकांनी दक्ष राहून वस्तंूच्या किमती व गुणवत्ता यांचा विचार करुनच योग्य वस्तूंची खरेदी करावी.
तक्रार निवारणाचा हक्क
वस्तूच्या खरेदीनंतर काही दोष आढळल्यास, हलक्या प्रतीची निकृष्ट वस्तू मिळाली किंवा भेसळयुक्त मिठाई असल्याचा संशय आल्यास किंवा खरेदीत फसवणूक झाली असे वाटत असल्यास ग्राहकाला त्यासंबंधित ग्राहक न्यायालयात तक्रार करण्याचा अधिकार आहे.
ग्राहक शिक्षणाचा हक्क
बाजारपेठेची व व्यापारी व्यवहाराची ग्राहकाला माहिती असणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आहेत.
आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क
सुदृढ जीवन जगण्यासाठी ग्राहकाला प्रदूषणापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे. याबरोबरच प्रामाणिकता मिळविण्याचा, मतप्रदर्शन करण्याचा, ग्राहकांचे प्रतिनिधीत्व करण्याचा हक्कही ग्राहकाला आहे.
ग्राहकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या
ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना दिलेल्या मोबदल्यानुसार वजनात, मापात, संख्येत बरोबरच मिळतील याची खात्री करुन घ्यावी.
वजन-काटा व स्वयंदर्शी काट्याचे इलेक्ट्रॉनिक्स इंडिकेटर याद्वारे केलेले वजन अचूक असल्याची खात्री करावी. इलेक्ट्रॉनिक्स स्केलच्या इंडिकेटरवर 00 (शून्य) असल्याखेरीज त्यावर वजन केले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे. मिठाई, ड्रायफ्रूटस्, खवा आदी खरेदी करतेवेळी त्यांचे वजन खोक्याशिवाय करणे दुकानदारास बंधनकारक आहे, याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे.
पॅकबंद मिठाई, ड्रायफ्रूटस्, भेटवस्तू व सजावटीच्या वस्तू आदींच्या आवेष्टनावर वस्तूचे नाव, उत्पादकाचे, आवेष्टकाचे किंवा आयातदाराचे नाव व संपूर्ण पत्ता, आवेस्टित वस्तूंचे निव्वळ वजन, माप, संख्या, विक्रीची किरकोळ किंमत, उत्पादनाचा महिना, वर्ष, तसेच उत्पादकाचा, आवेष्टकाचा किंवा आयातदाराचा ग्राहक हेल्पलाईन नंबर आदी बाबी घोषित करणे आवश्यक आहे. त्या बाबींचा उल्लेख केला आहे की नाही, हे ग्राहकांनी तपासून घ्यावे. तसेच ग्राहकांनी वस्तूसाठी छापील किमतीपेक्षा जास्त किंमत देऊन वस्तू खरेदी करू नये. वस्तूवरील छापील किमतीमध्ये खाडाखोड आढळल्यास अशी आवेष्टित वस्तू खरेदी करू नये व यासंदर्भात काही गैरप्रकार आढळून आल्यास नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८८६६६६ यावर अथवा ूि’े२ ूङ्मेस्र’ं्रल्ल३२@८ंँङ्मङ्म.ूङ्मे या ई-मेल पत्त्यावर किंवा वैधमापन शास्त्र विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी. ग्राहक व संरक्षण विभागांतर्गत राज्यातील ग्राहकांच्या तक्रारी निवारण्याकरिता तसेच त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करण्याकरिता राज्य शासनाने कंझ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या सहकार्याने राज्य ग्राहक हेल्पलाईन १५ सप्टेंबर २०११ पासून कार्यान्वित केली आहे. तिचा टोल फ्री क्रमांक १८०० २२२२६२ असा आहे. या क्रमांकावर ग्राहकांनी संपर्क साधावा.

Web Title: Consumer Rights, Duties, Responsibilities ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.