ग्राहकांनी सजग व्यवहार करावेत : विक्रम कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:42+5:302020-12-29T04:21:42+5:30

पंढरपूर येथे ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा मानदंड असणारी पुस्तिका ''''माहिती आणि कार्यदिशा''''चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ...

Consumers should be vigilant: Vikram Kadam | ग्राहकांनी सजग व्यवहार करावेत : विक्रम कदम

ग्राहकांनी सजग व्यवहार करावेत : विक्रम कदम

Next

पंढरपूर येथे ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा मानदंड असणारी पुस्तिका ''''माहिती आणि कार्यदिशा''''चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी आणलेल्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे व्यापारातील अरिष्ट रुढी परंपरांना आळा बसला आहे. ग्राहकांना ९० दिवसांत न्याय मिळणे सोपे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. स्वागत जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश फडे यांनी केले. प्रास्ताविक पुणे विभागीय सचिव गुरुनाथ बहिरट यांनी केले, तर शहराध्यक्ष दिनेश खंडेलवाल यांनी आभार मानले. यावेळी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, शहर पोलीस ठाण्यात पो. नि. अरुण पवार, आरटीओ कॅम्पमध्ये प्रभारी अधिकारी महेश रायबान यांच्या हस्ते ''माहिती आणि कार्यदिशा'' या पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरसेविका शकुंतला नडगिरे, ग्राहक पंचायतचे पांडुरंग बापट, मिलिंद वाईकर, सागर रणदिवे, विजय वरपे, दत्तात्रय ताठे, महादेव खंडागळे, नागेश आदापुरे, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Consumers should be vigilant: Vikram Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.