ऊस शेतीत अंतर्गत कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:23 AM2021-03-16T04:23:16+5:302021-03-16T04:23:16+5:30
पिकांसाठी ठिबकचा वापर वाढला दक्षिण सोलापूर : पाण्याची बचत व्हावी, यासाठी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक सिंचनचा वापर ...
पिकांसाठी ठिबकचा वापर वाढला
दक्षिण सोलापूर : पाण्याची बचत व्हावी, यासाठी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक सिंचनचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. ठिबक सिंचन केल्याने पाण्याची बचत तर होतेच शिवाय जास्त तण येत नाही. ठिबकमधून पिकांना खत देता येते, हे याचे फायदे आहेत.
भीमा नदीचे पात्र कोरडेठाक
मंगळवेढा : तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, अर्धनारी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, अरळी या गावाजवळून भीमा नदी वाहते. या नदीवरच बागायत शेती अवलंबून आहे. मात्र, सध्या नदीतील पाणी आटल्यामुळे पात्र कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
वीज खंडित केल्याने पाणीटंचाई
करमाळा : तालुक्यात अनेक ग्राहकांनी वीजबिल भरले नाही. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतशिवारात जनावरांसह नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही कालावधीसाठी वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
बोराळे-सिद्धापूर रस्ता दुरुस्तीची मागणी
मंगळवेढा : तालुक्यातील बाेराळे-सिद्धापूर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या स्थितीतही ऊस वाहतूक सुरूच होती. आता ती बंद झाली आहे. परंतु, तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी, शेतीच्या कामांसाठी ये-जा करण्यांसाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांकडून होत आहे.