"साखळी उपोषण शांततेत सुरू ठेवा"; जरांगे पाटलांचा सोलापूरकरांना व्हिडिओ कॉल

By बाळकृष्ण दोड्डी | Published: October 26, 2023 04:04 PM2023-10-26T16:04:39+5:302023-10-26T16:04:57+5:30

व्हिडिओ कॉलवरून जरांगे पाटलांचा सोलापूरकरांशी संवाद :

Continue the chain hunger strike in peace; I always get energy from Solapur, Says jarange patil | "साखळी उपोषण शांततेत सुरू ठेवा"; जरांगे पाटलांचा सोलापूरकरांना व्हिडिओ कॉल

"साखळी उपोषण शांततेत सुरू ठेवा"; जरांगे पाटलांचा सोलापूरकरांना व्हिडिओ कॉल

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र उगारले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव एकवटले आहेत. पूनम गेटवर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले असून गुरुवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. उपोषणकर्त्यांना व्हिडिओ कॉल करून मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधला. सोलापुरातून मला नेहमी ऊर्जा मिळते. तुम्ही शांततेत उपोषण सुरू ठेवा. समाज बांधवांना एकत्र करा, असे आवाहन त्यांनी केले. 

साखळी उपोषणाला सोलापुरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबत मराठा आरक्षणासाठी गावागावात उपोषण सुरू आहेत. याची दखल घेत मनाज जरांगे पाटील यांनी सोलापुरातील मराठा बांधवांशी संवाद साधला. जवळपास आठ मिनिटे त्यांनी सोलापूरकरांशी संवाद साधत उपोषण यशस्वी करण्याचे आवाहन देखील केले. गुरुवारी, उपोषणस्थळी माजी आमदार नरसय्या आडम तसेच बाळराजे पाटील यांनी हजेरी लावून उपोषणाला पाठिंबा दर्शवला.

Web Title: Continue the chain hunger strike in peace; I always get energy from Solapur, Says jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.