कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू बोरगाव येथील घटना: दोघांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: May 6, 2014 08:44 PM2014-05-06T20:44:09+5:302014-05-07T00:34:18+5:30
अकलूज : बोरगाव येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराने कंत्राटी कामगाराचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेस जबाबदार धरून वीज मंडळाच्या दोन कर्मचार्यांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
अकलूज : बोरगाव येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराने कंत्राटी कामगाराचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेस जबाबदार धरून वीज मंडळाच्या दोन कर्मचार्यांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
महाळुंग येथील नागेश भीमराव जाधव हे राज्य वितरण मंडळाच्या अकलूज विभागात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास बोरगाव येथील रवींद्र पाटील यांच्या शेतात डीपी बदलीसाठी विजेच्या खांबावर चढले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे ते तारेला चिकटले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता येथील उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
यावेळी ज्ञानेश्वर मुंडफणे-पाटील, नानासाहेब मुंडफणे, डॉ. हरिंद्र सावंत-पाटील, संभाजी जाधव, अनिल जाधव, ॲड. दत्तात्रय मुंडफ णे, भीमराव रेडे, शामराव भोसले, शकुर डांगे आदी पदाधिकार्यांनी वीज मंडळाच्या मनमानी कारभाराचे पाढे वाचले. त्यानंतर मयताच्या कुटुंबास मदत मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वीज मंडळाच्या अधिकार्यांनी १० हजार रुपयांची तातडीची मदतही दिली. (वार्ताहर)
----------------------------------------------
ऑपरेटर, लाईनमनवर ठपका
यावेळी नातेवाईकांनी नागेश जाधव याचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने वीज मंडळाचे अकलूज विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, शाखा अभियंता पी. एम. शिंदे आदी अधिकार्यांनी मध्यस्थी करून जाधव याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून वीज ऑपरेटर प्रदीप बावणे व लाईनमन दिलीप घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले.