कोरोनाकाळात आशासेविकांचे योगदान मोलाचे : शीतलदेवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:08+5:302021-03-15T04:21:08+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त देडकीकर मेडिकल सेंटर व माळीनगर आरोग्य उपकेंद्रातर्फे कोंडबावी, आनंदनगर, संग्रामनगर, प्रतापनगर, चाकोरे व अकलूज परिसरात कोरोनाकाळात ...
जागतिक महिला दिनानिमित्त देडकीकर मेडिकल सेंटर व माळीनगर आरोग्य उपकेंद्रातर्फे कोंडबावी, आनंदनगर, संग्रामनगर, प्रतापनगर, चाकोरे व अकलूज परिसरात कोरोनाकाळात योगदान देणाऱ्या ५२ आशा स्वयंसेविकांना माळीनगर आरोग्य उपकेंद्रात कोविडयोध्दा सन्मानपत्र देऊन शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी, देवडीकर मेडिकल सेंटरच्या संचालिका डॉ. वसुंधरा देवडीकर, माळीनगरच्या आरोग्य अधिकारी प्रियंका शिंदे, ज्येष्ठ कर्मचारी सुप्रिया जगताप, आरोग्यसेवक दादा फुंदे, लिपीक डी. एच. कुलकर्णी, आरोग्यसेवक कौस्तुब पोतदार, गटप्रवर्तक रूपाली काळे, शैला अवताडे, ज्योती बिडेकर यांच्यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
देशाच्या सीमेवर ज्याप्रमाणे आपले जवान जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करतात त्याप्रमाणे आशा स्वयंसेविकांनी आपला जीव धोक्यात घालून परिसरातील नागरिकांची सेवा केली आहे. यासाठी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मदतीने जिल्हा व राज्य प्रशासनाकडून सर्व आशा स्वयंसेविकांचे मानधन वाढविण्यासाठी यापुढे आपला प्रयत्न राहील, असे आश्वासनही शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी दिले.