सोलापूर विद्यापीठाचा १९ जानेवारीला दीक्षांत समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:25 PM2018-12-28T13:25:04+5:302018-12-28T13:26:35+5:30
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ १९ जानेवारी २०१९ रोजी दीक्षांत मंडपात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी ...
सोलापूर : सोलापूरविद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ १९ जानेवारी २०१९ रोजी दीक्षांत मंडपात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सहस्रबुद्धे हे स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. डॉ. सहस्रबुद्धे हे मूळचे हुबळी, कर्नाटकचे असून, ते गेल्या ३५ वर्षांपासून अभियांत्रिकी, वैज्ञानिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
शासनाच्या महत्त्वाच्या विविध पदांची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. प्रशासनाचाही दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ व वैज्ञानिक म्हणून ते परिचित आहेत. डॉ. सहस्रबुद्धे यांच्या रूपाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले अतिथी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला लाभणार आहेत.