कुच बिहार ट्रॉफी; सोलापुरात उद्या महाराष्ट्र-सिक्कीमचा क्रिकेट सामना, दोन्ही संघ सोलापुरात दाखल; सरावासाठी उतरले मैदानात
By Appasaheb.patil | Published: December 2, 2022 01:03 PM2022-12-02T13:03:58+5:302022-12-02T13:04:36+5:30
Solapur: बीसीसीआयच्या माध्यमातून सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) मैदानावर उद्यापासून चार दिवस महाराष्ट्र विरूद्ध सिक्कीम १९ वर्षाखालील खेळाडूंची कूचबिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - बीसीसीआयच्या माध्यमातून सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) मैदानावर उद्यापासून चार दिवस महाराष्ट्र विरूद्ध सिक्कीम १९ वर्षाखालील खेळाडूंची कूचबिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही संघ सोलापुरात दाखल झाले असून दोन्ही संघांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास मैदानावर सराव केला.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाकडून सोलापूरचे आर्शिन कुलकर्णी व यश बोरामणी यांचा समवेश असून त्यांचा खेळ आपल्या सोलापूरवासियांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सोलापूरकरांनी हे सामने पाहण्यासाठी इंदिरा गांधी स्टेडियमवर यावे असे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घघाटन सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन तथा आ. रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे रियाज बागवान व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता महानगरपालिकाचे अधिकारी , स्मार्ट सिटी व सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशनचे पदाधिकारी व सभासद प्रयत्नशील आहेत. या पत्रकार परिषदेस दतात्रय सुरवसे, चंद्रकांत रेम्बर्सू , श्रीकांत मोरे, प्रकाश भुतडा , दिलीप बचुवार - चीनीवार, संतोष बडवे , राजेंद्र गोटे , राजन कामत आदी उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मार्गदर्शनाखाली विविध समितीचे नियोजन केले असून स्पर्धा प्रमुख म्हणून धैयशील मोहिते पाटील हे काम पाहणार आहेत.