कुच बिहार ट्रॉफी; पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा पहिला डाव १३५ मध्ये संपुष्टात
By Appasaheb.patil | Published: November 6, 2024 05:30 PM2024-11-06T17:30:35+5:302024-11-06T17:30:48+5:30
केरळच्या आदित्य बैजू चे पाच तर कर्णधार अहम्मेद इम्रानचे चार बळी, एस अक्षयचे नाबाद अर्धशतक
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध केरळ या १९ वर्षाखालील कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पहिल्या दिवशी केरळ संघाने बाद धावा केल्या. तत्पूर्वी महाराष्ट्राचा पहिला डाव केवळ १३५ धावात संपुष्टात आला तो केरळचा सलामीचा मध्यमगती गोलंदाज आदिथ्य बैजू ने घेतलेल्या ५ तर कर्णधार फिरकी गोलंदाज अहम्मेद इम्रान ने घेतलेल्या ४ बळीमुळे.
सकाळी नाणेफेक जिंकून केरळ कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरवत आदित्थ ने तिसऱ्या व पाचव्या षटकात नीरज जोशी व साहिल नाळगे यांना शून्यावर बाद करत धक्के दिले. लगेचच ३१ धावांवर ३ रा गडी सुश्रुत सावंत आणि पाठोपाठ ३५ धावा असताना साहिल पारिखला बाद केला ते मोहम्मद जसील आणि आदित्थने. त्यानंतर आलेल्या कर्णधार किरण चोरमले ने (२४) यश्टिरक्षक अनुराग कवडे (२९) सोबत ४५ धावांची भागीदारी केली खरी पण दोघांना १५ धावांच्या फरकाने बाद केले ते कर्णधार मोहम्मद इम्रान याने (२९ धावात ४ बळी). त्यापुढील केवळ ११ धावात महाराष्ट्राने पुन्हा तीन गडी - पार्थ देवकर (०), कार्तिक शेवाळे (०), ओम भाबड (१२) गमावले.
जेवणाला खेळ थांबला तेव्हा ७ बाद १०३ धावसंख्या होती. त्यानंतर तळातील गडी योगेश चव्हाण ने थोडाफार प्रतिकार करत धावसंख्या १३५ पर्यंत नेली पण आदिथ्य ने त्याचा २४ धावात ५ वा बळी मिळवत महाराष्ट्राचा पहिला डाव पहिल्याच दिवशी ४१ व्या षटकात संपुष्टात आणला तो जेवणानंतर केवळ ७ षटक झाल्यावर. केरळच्या पहिल्या डावाची सुरूवात देखील डळमळीत झाली ती निलय शिंगवी ने तिसऱ्याच षटकात घेतलेल्या बळी मुळे. सलामीवीर अहमद खान (८) याच्यानंतर चहापानाच्या आधीच्या शेवटच्या चेंडूवर ओम भाबड कडून दुसरा गडी - एस.सौरभ (२१) बाद झाला तेंव्हा धावसंख्या झालेली ५८.
चहापान नंतर यष्टीरक्षक फलंदाज एस एस अक्षय आणि कर्णधार मोहम्मद इमरान यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५०+ धावांची भागीदारी करत धावसंख्या शंभर पार नेली. अक्षय ने ८४ चेंडूत ६ चौकारानिशी त्याचे अर्धशतक साजरे केले. ९९ धावांची भागीदारी झालेली असताना कर्णधार मोहम्मद इम्रान (३९) बाद झाला. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा ४७ षटकात केरळ संघाने ३ बाद १६५ धावा केलेल्या एस अक्षय नाबाद ६९ (९ चौकार) , थॉमस मॅथ्यू ६ धावांवर खेळत असून ३० धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून फाजिल मोहम्मद तर मैदानी पंच म्हणून अच्युत व सुद अभिरूपे हे आणि गुणलेखक म्हणून दोन्ही महिला केतकी नाईक जामगावकर व पूर्णिमा आपटे आणि ACLO म्हणू चंदन गंगावणे काम पाहत आहेत.