कोरोना अाईची टां...ग.! म्हणत पंढरपूरकरांनी केली रंगाची उधळण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 08:54 AM2020-03-13T08:54:55+5:302020-03-13T09:06:15+5:30
पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह; बालगोपाळांना सह ज्येष्ठ ही रंगले रंगात
पंढरपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे देशातील सगळे नागरिक भायभित असले तरी, पंढरपुरकरांनी मात्र कोरोना व्हायरसच्या आईची टांग म्हणत रंगांची उधळण रंगपंचमी उत्सव जल्लोषात साजरा केला.
सध्या कोरोना रोगामुळे देशातील सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे एकत्र येण्यास नागरिक तयार आहेत. या कोरोना रोगाच्या टेंशन मधून मुक्तता करण्याच्या दृष्टीने विठ्ठलाच्या नगरीमध्ये यमाई तुकाई नजीक असणाऱ्या तुळशी वृदावना समोर सकाळी साडे सहा ते नऊ या वेळेत वॉकिंग ग्रुपच्या वतीने रंगोत्सवाचे आयोजन केले होते.
यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, गटविकास अधिकारी रवींद्रकुमार घोडके, नगराध्यक्षा साधना भोसले, सुनील उंबरे, राजू कपदेकर यांच्यासह पत्रकार, सामाजिक, कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी सर्व कुटुंबासह या रंगपंचमीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे सर्वांनी उत्साहात नाचून रंगपंचमी साजरी केली.