टेंभुर्णीतील कोरोना आटोक्यात; ६०० ची रुग्णसंख्या आली ८२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:33+5:302021-05-25T04:25:33+5:30

एप्रिल महिन्यात शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६०० च्या पुढे तर मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. शहरातील दोन कोविड केअर सेंटर ...

In Corona Atoka in Tembhurni; The number of patients increased from 600 to 82 | टेंभुर्णीतील कोरोना आटोक्यात; ६०० ची रुग्णसंख्या आली ८२ वर

टेंभुर्णीतील कोरोना आटोक्यात; ६०० ची रुग्णसंख्या आली ८२ वर

Next

एप्रिल महिन्यात शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६०० च्या पुढे तर मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. शहरातील दोन कोविड केअर सेंटर व चार खासगी कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाली होती, तर कोठेही बेड मिळत नव्हते. उपचारासाठी रुग्णांना अकलूज ,इंदापूर, सोलापूर, पुणे व बार्शी येथे जावे लागत होते.

शासनाने लावलेले कडक निर्बंध, ग्रामपंचायत प्रशासनाने आठवडाभर केलेले संपूर्ण लॉकडाऊन व नंतर दहा दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले संपूर्ण लाॅकडाऊन या उपाययोजनांमुळे मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटू लागली आहे. टेंभुर्णी शहराच्या दृष्टीने ही दिलासादायक गोष्ट असली तरी शहराची लोकसंख्या विचारात घेता लसीकरणाचा वेग खूपच मंदावला आहे. लसीअभावी चार चार दिवस लसीकरण बंद असते. शहरात आतापर्यंत फक्त ३६३० लोकांचे लसीकरण झाले आहे.

----

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून नागरिकांनी शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाचे पालन करावे. लसीकरण व टेस्टिंगच्या ठिकाणी नियमाचे पालन करून आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे व जेष्ठ नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये.

- डाॅ. विक्रांत रेळेकर, वैद्यकीय अधिकारी, टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र

---

Web Title: In Corona Atoka in Tembhurni; The number of patients increased from 600 to 82

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.