नन्हेगावात कोरोनाविषयक जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:21 AM2021-05-23T04:21:40+5:302021-05-23T04:21:40+5:30
चपळगाव : कोरोनाचा प्रभाव वाढत असताना यावर काढलेल्या लसीसंदर्भात समाजात वेगवेगळ्या प्रकारचे समज-गैरसमज निर्माण होत आहेत; मात्र कोरोनाची लस ...
चपळगाव : कोरोनाचा प्रभाव वाढत असताना यावर काढलेल्या लसीसंदर्भात समाजात वेगवेगळ्या प्रकारचे समज-गैरसमज निर्माण होत आहेत; मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतर या व्हायरसपासून माणूस पूर्णपणे सुरक्षित राहतो हा संदेश समाजात रुजविण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील नन्हेगावचे सरपंच सिद्धार्थ गायकवाड, ग्रामसेवक जी.पी.गुरव आणि सर्व सदस्य सरसावले आहेत.
या सर्वांनी मिळून नन्हेगावातील ग्रामस्थांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी ती घेण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात झेडपी शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी, आशा वर्कर,ग्रा.प.सदस्य यांची बैठक झाली. बैठकीत गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्यासंदर्भात चर्चा झाली.
यावेळी सरपंच सिद्धार्थ गायकवाड, ग्रामसेवक जी. पी. गुरव,पोलीस पाटील आकाश गायकवाड, सविता बेडके, मुख्याध्यापक राजकुमार पारतनाळे, आनंद प्याटी, राहुल काशिद, अंगणवाडी सेविका तनुजा बिराजदार, सिद्धाराम गोगावे,ब्रह्मानंद उटगे,सुभाष मुलगे उपस्थित होते.
===Photopath===
220521\img-20210518-wa0013.jpg
===Caption===
कोरोनासंदर्भात नन्हेगाव ग्रामपंचायतीकडून जनजागृती करताना सरपंच सिध्दार्थ गायकवाड,ग्रा.प.सदस्य, आशा सेविका व अन्य..