शेटफळमध्ये दारावर डकवले कोरोना जनजागृतीचे पोस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:22 AM2021-04-07T04:22:44+5:302021-04-07T04:22:44+5:30
वडवळ : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्य प्राथमिक शिक्षकांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून गावातील लोकांमध्ये कोरोना जाणीवजागृती व्हावी, लसीकरणासाठी ...
वडवळ : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्य प्राथमिक शिक्षकांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून गावातील लोकांमध्ये कोरोना जाणीवजागृती व्हावी, लसीकरणासाठी नागरिक स्वयंस्फुर्तीने तयार व्हावेत या उद्देशाने शेटफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. तसेच गावक-र्यांच्या दारावर जागृतीचे पोस्टर डकवले जात आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मोहोळचे गटविकासअधिकारी गणेश मोरे, नोडल अधिकारी विकास यादव, सुप्रिया पवार, ग्रामविकासअधिकारी गणेश पवळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कोरोना प्रादुर्भाव रोखणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे,लसीकरणासाठी जागृती करणे या उद्देशाने गावात वार्डवाईज सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांपर्यंत त्रिसूत्री पोचावी,माझे दुकान माझी जबाबदारी अंतर्गत दशसुत्रीचे पालन व्हावे यासाठी" जर आपण सुरक्षित तर देश सुरक्षित.." .,कोरोनाला घाबरु नका पण जागरूक रहा."..,मास्क व शारीरिक अंतर,कोरोना होईल छू-मंतर..".ग्रामपंचायतला सहकार्य करुया,कोरोना हद्दपार करुया...!, अशा धोषवाक्यांचे पोस्टर बनवून ते घरोघरी चिटकवले.
यासाठी मुख्याध्यापिका उमा गुंड, संगीता पाटील, सुरेखा मोरे, शशिकांत जाडकर, संतोष लोंढे, विठ्ठल पवार, सुवर्णा खडके, सरीता थोरात, गणेश थोरात, माधवी जोशी, तनुजा इंगळे, रजिया तांबोळी, मनिषा थोरात, रविंद्र देबडवार, मयूर गोणेकर, अर्चना पांडे यांनी परिश्रम घेतले.
---
०६ शेटफळ
शेटफळ येथे घरोघरी पोस्टर लावून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे