पंढरपुरात ‘कोरोना’ चा धसका; गर्दी ओसरली.. पांडुरंगाचे झटपट दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:34 AM2020-03-13T11:34:08+5:302020-03-13T12:04:54+5:30
विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात दर तासाला स्वच्छता; दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत घट
सचिन कांबळे
पंढरपूर: कोरोना व्हायरसमुळे पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून येणाºया भाविकांच्या संख्येत घट झाली आहे. यामुळे मंदिर समितीकडून नामदेव पायरीपासून दर्शन रांग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांना पांडुरंगाचे झटपट दर्शन होऊ लागल्याच्या प्रतिक्रिया भाविकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, मंदिर समितीकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर तासाला स्वच्छतेवर भर दिला आहे.
कोरोना व्हायरसच्या भीतीने महाराष्टÑातील अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये दर्शनासाठी येणाºया भाविकांची गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. हा अनुभव श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या बाबतीतही येत आहे. नेहमीपेक्षा २० टक्के भाविकांची संख्या घटली आहे. दरम्यान, गर्दी घटल्यामुळे मंदिर प्रशासनाने दर्शन रांग नामदेव पायरीपासून सुरू केली आहे. यामुळे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलेले सर्व भाविक मुखदर्शनाऐवजी पदस्पर्श दर्शन घेत आहेत. यामुळे दर्शन रांग झटपट पुढे जात आहे.
कोरोनाची चर्चा सुरू असली तरी गुरुवारी भजनाच्या कार्यक्रमासाठी श्री विठ्ठलाच्या सभामंडपामध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले. कोरोना व्हायरसबाबत खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरात एका तासाला स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. सध्या फाल्गून महिना सुरू असल्यानेही गर्दीवर परिणाम झाला असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
कर्मचारी, भाविकांना मोफत मास्क व सॅनिटायझर
- सध्या सगळीकडे कोरोना विषाणूंच्या भीतीने सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अशातच सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरपूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष प्रशांत खलिपे यांनी मंदिर समिती कर्मचारी व भाविकांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. यावेळी सोलापूर येथील औषध प्रशासन अधिकारी नामदेव भालेराव, मंदिर समिती सदस्य शकुंतला नडगिरे, प्रशांत खलिपे आदी उपस्थित होते. अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी व सभासद व मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.