कोरोना आला अन्‌ हमखास दाम देणाऱ्या कलिंगडाने केला घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:58+5:302021-06-04T04:17:58+5:30

बार्शी तालुक्यात पूर्वी कलिंगडाचे उत्पादन फारसे घेतले जात नसायचे. मात्र मागील तीन-चार वर्षांपासून उपळाई ठोंगे, कांदलगाव, खडकलगाव आदी गावांत ...

Corona came and did a scam by a watermelon that pays a lot of money | कोरोना आला अन्‌ हमखास दाम देणाऱ्या कलिंगडाने केला घोटाळा

कोरोना आला अन्‌ हमखास दाम देणाऱ्या कलिंगडाने केला घोटाळा

Next

बार्शी तालुक्यात पूर्वी कलिंगडाचे उत्पादन फारसे घेतले जात नसायचे. मात्र मागील तीन-चार वर्षांपासून उपळाई ठोंगे, कांदलगाव, खडकलगाव आदी गावांत कलिंगडाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले आहे. तालुक्यातील इतर गावांतही कमी-अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. साधारणपणे लागवड केल्यानंतर ६० दिवसांत कलिंगडाचे पीक उत्पादन देऊन जाते.

कलिंगडची लागवड ते काढणी या दोन महिन्यांच्या काळात एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. यात एकरी २० ते ३२ टन माल निघतो. मागील वर्षी ९ ते १० रुपये किलो असा दर होता. मात्र, यंदा शेतकरी तिहेरी अडचणीत सापडला आहे. कारण लॉकडाऊन तर आहेच; परंतु यदा उन्हाळा म्हणावा तसा कडक गेला नाही. अधूनमधून एप्रिल आणि मे महिन्यातदेखील आभाळ येऊन पाऊस पडत गेला. त्यामुळे कलिंगड खाण्याचे प्रमाणही कमी राहिले.

---

एक रुपया किलोही कोणी घेईना

सततच्या वातावरण बदलांमुळे कलिंगडाच्या प्लॉटवर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला व रोगाला पीक बळी पडले. त्यामुळे एक रुपया किलो दरानेदेखील कोणताच व्यापारी कलिंगड घेऊन जाण्यास तयार नसल्याचे कांदलगाव येथील कलिंगड उत्पादक शेतकरी बालाजी करडे व महादेव जगदाळे यांनी सांगितले.

---

---

जनावरांना दिले मोफत

यामुळे आम्ही शेतातून कलिंगड बाहेर न काढता, जवळच असलेल्या उपळाई येथील इंद्रेश्वर शुगर या साखर कारखान्यावरील जनावरांच्या मालकांना फुकट कलिंगड देऊन टाकल्याचे सांगितले.

Web Title: Corona came and did a scam by a watermelon that pays a lot of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.