कोरोनाचे संकट तर आहेच आता पुराची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:33+5:302021-06-09T04:27:33+5:30

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती बैठक सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे घेण्यात आली. या ...

The Corona crisis is the possibility of flooding now | कोरोनाचे संकट तर आहेच आता पुराची शक्यता

कोरोनाचे संकट तर आहेच आता पुराची शक्यता

Next

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती बैठक सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे घेण्यात आली. या बैठकीत तहसीलदार सुशील बेल्हेकर बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, सहाय्यक उपनिबंधक एस. एम. तांदळे, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, भीमा पाटबंधारे विभागाचे एस. एन. चौगुले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्यावर्षी अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावांसह शेतीपिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील नदी काठच्या गावांना संभाव्य पुरामुळे कोणताही धोका पोहोचणार नाही तसेच जीवित व वित्तहानी होणार नाही यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत योग्य नियोजन करण्यात आले आहे तसेच महापुरामुळे नदीकाठावरील गावांमधील ज्या लोकांची घरे पुरामुळे बाधित झाली आहेत. त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे तसेच तालुका प्रशासनाकडून संबंधित गावातील शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, धर्मशाळा आदी सुरक्षित ठिकाणी थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बेल्हेकर यांनी दिली.

नदीपात्रातील अतिक्रमणे काढावी

उजनी धरनातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत संबंधित विभागाने समन्वय ठेवून नियोजन करावे. नदीपात्रातील अतिक्रमणे केलेल्या नागरिकांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत. नदी, नाले, ओढे यावरील असलेल्या पुलांची व संरक्षण कठड्यांची पाहणी बांधकाम विभागाने करावी. पावसाळ्यात साथीचे रोग अधिक उद्‌भवण्याची शक्यता असते यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा व औषध पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

फोटो ::::::::::::::::::::

तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती बैठकीदरम्यान बोलताना तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके व अन्य अधिकारी.

Web Title: The Corona crisis is the possibility of flooding now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.