मंगळवेढ्यात कोरोना चारशे पार; शुक्रवारी २१ रुग्ण पॉझिटिव्ह, मृत्यूची संख्या चार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 10:00 PM2020-08-21T22:00:55+5:302020-08-21T22:01:00+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात शुक्रवारी २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४०० पार झाली आहे.
दरम्यान, २१ ऑगस्ट २५ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह ३ आणि निगेटिव्ह २२ आलेले आहेत. यात मंगळवेढा शहर २, मरवडे १ हे येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत. तर सोलापूर येथे पाठविण्यात आलेले स्वबमधील १८ रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. यात मंगळवेढा शहर ९, दमाजीनगर ५, देगाव १, अंधळगाव १, ब्रह्मपुरी १, तांडोर १ असे १८ रुग्ण येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आजअखेरपर्यंत ४०३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २१६ रुग्णांना उपचार कालावधीनंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या १८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी १३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे.