आई-वडिलांना कोरोनानं हिरावलं अन् ज्ञानेश्वर झाला पोरका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:22 AM2021-05-26T04:22:43+5:302021-05-26T04:22:43+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडीतील शोभा पोपट घोडके या ५५ वर्षांच्या महिला दिराची सून उपचार घेत असलेल्या सोलापुरातील खासगी रुग्णालयात ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडीतील शोभा पोपट घोडके या ५५ वर्षांच्या महिला दिराची सून उपचार घेत असलेल्या सोलापुरातील खासगी रुग्णालयात सोबत राहिल्या. सूनबाई सुखरुप घरी आल्या. मात्र, सासुबाई कोरोनाला सोबत घेऊन भागाईवाडीत परतल्या. दोन - तीन दिवसांनंतर त्रास सुरू झाल्याने शोभा यांना बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच शोभा यांचा मृत्यू झाला. चार दिवसांनंतर पती पोपट तुळशीराम घोडके यांनाही कोरोना उपचारासाठी दाखल केले. मात्र, पोपट यांचाही मृत्यू झाला. दोन बहिणींची लग्न झाल्याने घरात एकटात राहिलेला ज्ञानेश्वर आता पोरका झाला आहे.
-----
११ दिवसात दोघांचा मृत्यू
भागाईवाडीचे शोभा व पोपट हे पती- पत्नी दोघे दगावले. शोभा यांचा मृत्यू २६ एप्रिल रोजी, तर पोपट यांचा मृत्यू ७ मे रोजी झाला. आईच्या मृत्यूनंतर अकरा दिवसांनी वडिलांचा मृत्यू झाल्याने भागाईवाडीत गावात हळहळ व्यक्त होत आहे.
----
फोटो : २४ शोभा घोडके, २४ पोपट घोडके