कोरोनाचा परिणाम; उत्तर प्रदेश, बिहार, आसामकडे जाणाऱ्या १३ रेल्वे गाड्या रद्द

By appasaheb.patil | Published: April 15, 2021 06:08 PM2021-04-15T18:08:47+5:302021-04-15T18:09:11+5:30

कोरोनाचा परिणाम : मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती

Corona effect; 13 trains bound for Uttar Pradesh, Bihar and Assam canceled | कोरोनाचा परिणाम; उत्तर प्रदेश, बिहार, आसामकडे जाणाऱ्या १३ रेल्वे गाड्या रद्द

कोरोनाचा परिणाम; उत्तर प्रदेश, बिहार, आसामकडे जाणाऱ्या १३ रेल्वे गाड्या रद्द

Next

सोलापूर : वाढत्या कोरोनामुळे मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागातून उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, झारखंडकडे जाणाऱ्या १३ रेल्वे एक्स्प्रेस गाड्या १ मे २०२१ पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासोबतच अन्य राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यासोबतच मृत्यू दराचा आलेख ही चांगलाच उंचावला आहे, अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकीच बुधवारी रेल्वे प्रशासनाने उत्तर प्रदेश बिहार झारखंड आसाम राज्याकडे जाणाऱ्या मेल, पॅसेंजर, एक्सप्रेस, विशेष गाड्या १६ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

--------------------

या आहेत रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  • - मुंबई-गदग
  • - गदग-मुंबई
  • - पुणे-नागपूर
  • - नागपूर-पुणे
  • - पुणे-अंजनी
  • - अंजनी- पुणे
  • - पुणे-अमरावती
  • - अमरावती- पुणे
  • - नागपूर- पुणे विशेष
  • - पुणे-नागपूर
  • - नागपूर- अहमदबाद
  • - अहमदाबाद -नागपूर
  • - पुणे -अंजनी विशेष एक्सप्रेस

––-------------------

अन्य राज्यातून येणाऱ्यांची स्थानकावर तपासणी

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ते 30 एप्रिल पर्यंत खडक संचारबंदी चे आदेश दिले आहेत, याच पार्श्वभूमीवर अन्य राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक रेल्वे प्रवाशांची त्या-त्या रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. संबंधित महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवाय काही राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यापूर्वी कोरूना चाचणीचे निगेटीव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

-

Web Title: Corona effect; 13 trains bound for Uttar Pradesh, Bihar and Assam canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.