सुस्ते येथे ८६ जणांची कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:08+5:302020-12-16T04:37:08+5:30
सहा महिन्यात सुस्ते येथे एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नव्हता; मात्र चार महिन्यात तब्बल ७३ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. ९ ...
सहा महिन्यात सुस्ते येथे एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नव्हता; मात्र चार महिन्यात तब्बल ७३ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. ९ डिसेंबर रोजी सुस्ते येथील पहिला बळी गेला आहे. दिवसेंदिवस सुस्ते येथे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुस्ते येथे रॅपिड अँटिजेन तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य, हॉटेल चालक यांच्या तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी ग्रामविकास अधिकारी विष्णू गवळी, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत नवत्रे, डाॅ. रणजित रेपाळ, मुख्याध्यापक सुभाष अधटराव, आनंद चव्हाण, आरोग्य सहायक ए. एफ. शेख, आरोग्य सेविका एस. डी. चौगुले, आशा वर्कर, मदतनीस संगीता चव्हाण, अंगणवाडी सेविका वंदना पंडित, बिभीषण पाटील, नवनाथ सपाटे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :::::::::::::::::::::
सुस्ते (ता. पंढरपूर) येथे नागरिकांची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी श्रीकांत नवत्रे व डॉ. रणजित रेपाळ.