मंगळवेढा शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला; नगरपरिषद प्रशासन अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 02:07 PM2020-07-10T14:07:29+5:302020-07-10T14:08:10+5:30
शहरालगतच्या दोन ग्रामपंचायतसह संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित; तीन किलोमीटर पर्यतच्या सीमा सील
मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील गुंगे गल्ली येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्याने शहरातील गुंगे गल्ली, मंगळवेढा नगरपरिषद हद्द परिसर, शहरालगत ग्रामीण परिसर आणि शहरातील श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायत परिसर व संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परिसर व त्याच्या आजूबाजूच्या तीन किलोमीटर क्षेत्रापर्यतच्या सर्व बंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
मंगळवेढा ग्रामीण भागात बोराळे गावात पहिला रुग्ण आढळून आला त्यानंतर दुसऱ्या दिवशीच शहरात गुंगे गल्ली येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्ग रोखण्यासाठी त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत शहरातील गुंगे गल्ली, मंगळवेढा नगरपरिषद हद्द परिसर, शहरालगत ग्रामीण परिसर आणि शहरातील श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायत परिसर व संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परिसर व त्याच्या आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे तर या परिसराच्या तीन किलोमीटर अंतरापर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी जाहीर केला आहे.
सध्या शहरासह परिसरातील श्री संत दामाजी नगर व श्री संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत परिसरातील सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली आहेत मात्र ही दुकाने किती दिवस बंद राहणार याबाबत प्रशासनाने जाहीर न केल्याने व्यापाऱ्यात संभ्रमावस्था आहे.