कुरुल, कर्देहळळी, गुरववाडी, वाळूज, मुळेगांव येथे आढळले कोरोना बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:09 IST2020-06-20T16:08:12+5:302020-06-20T16:09:24+5:30
सोलापूर जिल्ह्यात शनिवारी १८ जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

कुरुल, कर्देहळळी, गुरववाडी, वाळूज, मुळेगांव येथे आढळले कोरोना बाधित रुग्ण
सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील कुरूल दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी आणि अक्कलकोट तालुक्यातील गुरुववाडी येथे नव्याने कोरोना रुग्ण आढळले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.
सिविल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून शनिवारी सकाळी २५० अहवाल आले त्यापैकी सातजण पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर दुपारच्या अहवालामध्ये अठरा जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मोहोळ येथील क्रांतीनगर, तालुक्यातील वाळुज व कुरुल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. अक्कलकोट शहरातील एक व तालुक्यातील गुरववाडी येथील एक असे दोन रुग्ण आहेत. वैराग: दोन, बार्शी एक, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी : १, विडी घरकुल : ३, मुळेगाव : ६ असे रुग्ण आढळले आहेत.