पत्नी, मुलापाठोपाठ कुटुंबकर्त्याचाही कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:04+5:302021-05-09T04:23:04+5:30

उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहे. बीबीदारफळमध्ये जास्त आहे. गत महिनाभरात केवळ कोरोनामुळे २०, तर ...

Corona killed his wife and children | पत्नी, मुलापाठोपाठ कुटुंबकर्त्याचाही कोरोनामुळे मृत्यू

पत्नी, मुलापाठोपाठ कुटुंबकर्त्याचाही कोरोनामुळे मृत्यू

Next

उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहे. बीबीदारफळमध्ये जास्त आहे. गत महिनाभरात केवळ कोरोनामुळे २०, तर २४ जणांचा हृदयविकार, इतर आजार व वयोमानानुसार निधन झाले आहे. गेल्या ४४ दिवसांत एकूण ४४ लोकांचा मृत्यू झाला. यात कुटुंबकर्ते पांडुरंग साठे यांच्यासह पत्नी व मुलाचाही समावेश आहे.

पांडुरंग साठे यांच्या पत्नी कौशल्या साठे यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. २२ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा महेश हेसुद्धा पॉझिटिव्ह झाले. तसेच पांडुरंग साठे यांनाही बाधा झाली. उपचार सुरू असलेल्या पांडुरंग साठे यांना पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी गावात आणले. नंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी मुलगा महेश साठे (वय ३८) यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या अनुपस्थितीत महेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबकर्ते पांडुरंग साठे यांच्यावर उपचार सुरू असताना ८ तेही कोरोचे बळी ठरले. घरातील तिघे कोरोनामुळे दगावल्याने आता महेशची पत्नी पूनम यांच्यावर तिच्या तीन लहान मुलांची जबाबदारी पडली आहे.

चौकट

मुलगी, जावई यांचाही आजाराने मृत्यू

पांडुरंग साठे यांची विवाहित मुलगी व जावई यांचा काही वर्षांपूर्वी आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या दोन मुलांचा सांभाळ पांडुरंग साठे करीत होते. आई-वडील, भाऊ कोरोनाग्रस्त झाल्याने दुसरी विवाहित मुलगी त्यांच्याजवळ थांबली होती. तिलाही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे साठे कुटुंबावर कोरोनारूपी संकटामुळे ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

मायलेकाचा मृत्यू

मागील आठवड्यात सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र ननवरे व त्यांच्या आई कमल या मायलेकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

पिता-पुत्राचाही मृत्यू

महादेव सावंत या ३८ वर्षांच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे वडील रामकृष्ण सावंत यांचाही याच आजाराने मृत्यू झाल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला.

फोटो

०८ पांडुरंग साठे,

०८कौशल्या साठे

०८ महेश साठे

Web Title: Corona killed his wife and children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.