कोरोनामुळे शहरात आणखी सहा जणांचा मृत्यू; नव्याने आढळले २८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 07:25 PM2020-06-07T19:25:14+5:302020-06-07T19:27:09+5:30
सोलापूर शहरात कोरोना बक्षितांची संख्या वाढली; एकूण रुग्णसंख्या पोहचली 1188 वर
Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क
सोलापूर : शहरात कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू झाला असून नव्याने २८ रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील मृतांची संख्या आता १०७ झली असून रुग्णांची संख्या ११८८ झाली आहे.
नव्याने आढळलेले रुग्ण निराळे वस्ती, मुकूंद नगर, सिध्देश्वर पेठ, हनुमान नगर, विजापूर रोड, मड्डी वस्ती, दत्तनगर, बुधवार पेठ, न्यू बुधवार पेठ, रंगभवन, प्रताप नगर विजापूर रोड, मंत्री चंडक भवानी पेठ, पाथरुट चौक, नरसिंग व्कार्टर सिव्हील हॉस्पिटल, बुधवार पेठ वडार गल्ली, अवंती नगर जुना पूना नाका, निलम नगर, मसिहा चौक, मरिआई चौक, श्रीकृष्ण वसाहत, मॉर्डन हायस्कूलजवळ या भागातील आहेत.