कोरोनामुळे कावडींची वाट पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:22 AM2021-04-21T04:22:44+5:302021-04-21T04:22:44+5:30
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शंभू महादेवाची यात्रा म्हणजे भक्तांची मोठी पर्वणी असते. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या यात्रेत एकादशीला भक्तांचा महापूर ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शंभू महादेवाची यात्रा म्हणजे भक्तांची मोठी पर्वणी असते. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या यात्रेत एकादशीला भक्तांचा महापूर येतो. गतवर्षीपासून या यात्रेला कोरोना महामारीचे ग्रहण लागले आहे. चैत्री यात्रेनिमित्त राज्यभरातून कावडी शिखर शिंगणापूरकडे जातात. या कावडी गुढीपाडव्यापासून सजलेल्या असतात. अशा कावडी वाद्याच्या गजरात गावोगावी ये-जा करतात. यासाठी अनेक ठिकाणी जेवणाच्या पंगती घातल्या जातात व शंभो महादेवाच्या भेटीला वाद्याच्या गजरात शिखर शिंगणापूरकडे निघतात. त्यामुळे गावोगावी कावड्यांचा माहोल तरुणाईला आकर्षित करणारा ठरतो. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे कावड्यांचा माहोल दृष्टीस पडत नाही.
फोटो लाईन :::::::::::::::::::::
चैत्री यात्रेनिमित्त शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या असा शुकशुकाट दिसत आहे.