दाराशा, शेळगी परिसरात आढळले कोरोना रूग्ण; सोलापूरची रूग्णसंख्या पोहोचली ३१ वर
By Appasaheb.patil | Published: March 19, 2023 05:23 PM2023-03-19T17:23:37+5:302023-03-19T17:26:24+5:30
ग्रामीण भागातील रूग्णसंख्येत घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर : शहरातील कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूरची रूग्णसंख्या ३१ वर पोहोचली आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात तीन रूग्ण कोरोना बाधित आढळले असून ते दाराशा व शेळगी नागरी आरोग्याच्या हद्दीतील रूग्ण असल्याचे सांगण्यात आले. मात्र ग्रामीण भागातील रूग्णसंख्येत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शनिवारी ३० रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली.
त्यातील २७ जणांचा रिपेार्ट निगेटिव्ह आला असून तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ३१ ते ५० वयोगटातील २ तर ५१ ते ६० वयोगटाील एका रूग्णाचा समावेश आहे. सध्या ३१ रूग्णावर घरच्या घरीच उपचार करण्यात येत आहे. आजपर्यंत सोलापूर शहरात ३४ हजार ५९३ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यापैकी १ हजार ५१७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३३ हजार ४५ रूग्ण घरातून बरे होऊन परतले आहे.
ग्रामीण भागातील ५ रूग्णावर उपचार सुरू
सध्या ग्रामीण भागातील ५ रूग्णावर उपचार सुरू आहेत. दक्षिण सोलापूर २, उत्तर सोलापूर २ व सांगोला तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची संख्या घटली असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने कळविले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, आवश्यक ती काळजी घ्या, मास्क वापरा असे आवाहन करण्यात आले आहे.