सोरेगाव, अक्कलकोटमध्ये आढळला कोरोनाचा रूग्ण; रूग्णसंख्या पोहोचली ३९ वर
By Appasaheb.patil | Updated: March 23, 2023 18:56 IST2023-03-23T18:56:25+5:302023-03-23T18:56:33+5:30
शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सोरेगाव, अक्कलकोटमध्ये आढळला कोरोनाचा रूग्ण; रूग्णसंख्या पोहोचली ३९ वर
सोलापूर : शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरूवारी प्राप्त झालेल्या अहवालात सोरेगाव नागरी आरोग्य परिसर व अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा एक रूग्ण आढळून आल्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, बुधवारी ९ रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ८ जण निगेटिव्ह आले तर एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तो रूग्ण १६ ते ३० वयोगटातील आहे. सध्या २८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरात काेरोनाचे एकूण रूग्णसंख्या ३४ हजार ६१५ एवढी झाली असून मृतांची संख्या १ हजार ५१९ एवढी झाली आहे.
अक्कलकोटमध्ये आढळला कोरोनाचा रूग्ण ग्रामीण भागात बुधवारी २२ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी २१ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ११ रूग्णावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत ३ हजार ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ८७ हजार ४२८ जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते.