Coronavirus : सोलापुरात ‘कोरोना’ चा रूग्ण !

By Appasaheb.patil | Published: March 5, 2020 02:42 PM2020-03-05T14:42:21+5:302020-03-05T15:13:57+5:30

Coronavirus : शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण; रूग्णालय प्रशासनाकडून चिंता न करण्याचे केले आवाहन

'Corona' patient in Solapur! | Coronavirus : सोलापुरात ‘कोरोना’ चा रूग्ण !

Coronavirus : सोलापुरात ‘कोरोना’ चा रूग्ण !

googlenewsNext
ठळक मुद्दे- नागरिकांनी भिती न बाळगण्याचे केले वैद्यकीय अधिकाºयांनी आवाहन- तो रूग्ण कोरोना चा नसल्याचे हॉस्पीटल प्रशासनाकडून स्पष्ट- सोशल मिडियावर संदेश व्हायरल होत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा रूग्ण आढळला अशी भिती शहरवासियांमध्ये व्यक्त होत आहे. मात्र याला वैद्यकीय क्षेत्रातून कोणताच दुजोरा देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर तो रूग्ण नाशिकचा असून तो तिरूपतीवरून आला होता. आता त्या रूग्णास पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आल्याची अफवा सोशल मिडियावर फिरत आहे. दरम्यान, सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या संदेशामुळे अनेक सोलापूरकर ‘लोकमत’ ला दुरध्वनीकरून यासंदर्भात चौकशी करीत आहेत व माहितीही देत आहेत.

सोलापुरातील एका मोठया रूग्णालयात न्यूमोनियाचा रूग्ण उपचार घेत आहे. यावरून शहरात कोरोनाचा रूग्ण आढल्याची भिती व्यक्त झाली़ न्यूमोनिया हा आजार कोरोनाच्या अनेक लक्षणापैकी एक असल्याने भिती अधिकच बळावली आहे. मात्र या रूग्णालयाच्या वैद्यकीय प्रमुखांनी हा रूग्ण कोरोनाचे असल्याचे स्पष्ट केले नाही़ हे रूग्णालय लवकरच प्रेस रिलीज जारी करून सविस्तर माहिती देणार आहे.

अश्विनी हॉस्पीटलकडून प्रेस रिलीज जारी...
सोलापुरातील अश्विनी सहकारी रूग्णालयामध्ये ४ मार्च २०२० रोजी एक रूग्ण उपचारासाठी दाखल झाला होता़ सदर रूग्ण न्यूमोनियाचा होता़ रूग्णालयाने सदर रूग्णाची तपासणी केली असता, रूग्ण न्यूमोनियाया आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. रूग्णांच्या विनंतीवरून रूग्णास पुणे येथे नेण्यात आले आहे. अश्विनी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ़ राजेंद्र घुली यांनी रूग्णालयामध्ये नोविल कोरोनाग्रस्त बाधित अथवा संशयित रूग्ण दाखल नसल्याचे सांगितले. यासंबंधी कोणताही गैरसमज होऊ नये याकरिता हॉस्पीटल प्रशासनाकडून प्रेसनोट जाहीर करण्यात आली आहे.
-------------
कोण आहेत संदीप मोकाशी...
संदीप मोकाशी हे आर्किटेक्चर आहेत. पूर्वी पंधे कन्ट्रक्शन याच्याकडे आडम मास्तरांच्या गोदुताई घरकुलाचे काम करीत होते. आता त्यांच्या स्वतंत्र्य कारभा सुरू आहे. कामानिमित्त महसुल कार्यालयात फायली घेऊन ते नेहमी येत असत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

Web Title: 'Corona' patient in Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.