उत्तर सोलापूर, सांगोल्यात आढळले कोरोनाचे रूग्ण; ग्रामीणमधील सहा जणांवर उपचार
By Appasaheb.patil | Published: March 17, 2023 02:29 PM2023-03-17T14:29:55+5:302023-03-17T14:30:29+5:30
सध्या कोरोनाचे रूग्ण शहरी भागासह ग्रामीण भागातही वाढू लागले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आवश्यक त्या उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सुरू केल्या आहेत.
सोलापूर - उत्तर सोलापूर, सांगोल्यात कोरोनाचा रूग्ण शुक्रवारी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात उत्तर सोलापूर, सांगोल्यात प्रत्येकी एक एक रूग्ण आढळून आला आहे. शुक्रवारी ५३ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यात दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील ३, सांगोल्यातील १ व दक्षिण सोलापूर तालुक्यातील २ जणांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ३१५ रूग्ण आढळून आले असून मृतांचा आकडा २ हजार ९२५ वर पोहोचला आहे. सध्या फक्त सहा रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या कोरोनाचे रूग्ण शहरी भागासह ग्रामीण भागातही वाढू लागले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आवश्यक त्या उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्कचा वापर करावा, काही लक्षणं दिसू लागल्यास जवळच्या डॉक्टरांना भेटावे असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.