वाळूजमधील डॉक्टराची आई कोरोना पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:43 AM2020-06-20T11:43:18+5:302020-06-20T11:45:43+5:30
संपर्कातील लोकांना केले क्वारंटाइन; आरोग्य यंत्रणेकडून गावातील लोकांची तपासणी
वाळूज : वाळूज (ता. मोहोळ) येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ त्यामुळे त्या महिलेच्या घराजवळील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
दरम्यान, शनिवारी सोलापूर शासकीय रूग्णालयाने कोरोना बाधित अहवाल जाहीर केला़ मंगळवार १६ जून रोजी त्यांना त्रास होत असल्याने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यानंतर उपचारावेळी त्यांना अधिकचा त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोनासाठी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्या स्वॅबचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाल्यानंतर मोहोळ तालुका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मोहोळचे तहसिलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी अजिंक्य टेळे, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, आरोग्य अधिकारी समीर पटेल यांनी वाळूजला भेट देऊन त्या महिलेच्या घराजवळील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून तो परिसर सील केला.