कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना मिळणार खास रजा; शाळेजवळ असणार पोलिसांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:16 PM2020-11-21T15:16:09+5:302020-11-21T15:16:41+5:30
अक्कलकोटमध्ये दोन तर सांगोल्यात सहा शिक्षक पॉझिटिव्ह; जवळच्या शाळेतील शिक्षकांची मदत शाळेसाठी घेणार
सोलापूर : सोलापूरशाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या घेण्यात यात असलेल्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या शिक्षकांना उपचारासाठी खास रजा देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली
जिल्हा आरोग्य विभागाकडे आत्तापर्यंत अक्कलकोट व सांगोला तालुक्यातील अहवाल प्राप्त झाले आहेत अक्कलकोटमध्ये ९४० चाचण्या घेण्यात आल्या, त्यात दोन शिक्षक पॉझिटिव्ह वाढवले आहेत. सांगोला मध्ये ८८१ चाचण्या घेण्यात आल्या, त्यात सहा शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांना त्रास होत असेल तर उपचारासाठी खास सुविधा करण्यात आली आहे, त्यांना आराम करण्यासाठी रजा दिली जाणार आहे.
ज्या शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आढळले त्या शाळा सोमवारी सुरू करण्यासाठी बाजूंच्या शाळांमधील विषय शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शाळा परिसरात सोमवारी खास पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलिसांना दिले आहेत.