बार्शीतील स्कूलबस चालकांचे कोरोना काळातील भाडे थकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:40 AM2021-02-18T04:40:02+5:302021-02-18T04:40:02+5:30

कारी : कोरोना काळामध्ये डॉक्टर, परिचारिका यांची कुवतीनुसार या मदतीचा हात पुढे झाला. बार्शी तालुक्यातील खांडवी येथील ...

Corona of school bus drivers in Barshi exhausted the fare of the period | बार्शीतील स्कूलबस चालकांचे कोरोना काळातील भाडे थकवले

बार्शीतील स्कूलबस चालकांचे कोरोना काळातील भाडे थकवले

Next

कारी : कोरोना काळामध्ये डॉक्टर, परिचारिका यांची कुवतीनुसार या मदतीचा हात पुढे झाला. बार्शी तालुक्यातील खांडवी येथील जिजाऊ प्रा .शाळा, सौंदरे येथील महात्मा फुले विद्यामंदिर उपळे दुमाला येथील ग्लोरी इंग्लिश स्कूल, सावरगाव राजमाता ब्रिलिएट इंग्लिश या खाजगी शाळांच्या स्कूल बसेस वापरण्यात आल्या. चार महिने सेवा देऊनही त्यांना त्यांचा मोबदला दिला गेला नाही. या खासगी शाळा बसचालकांवर उपासमारीची वेळ आली असून थकीत मानधन देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोरोना काळात आरोग्य सेवेसाठी विभागीय दांडाधिकारी (सोलापूर) यांच्या आदेशान्वये चालकांचे मानधन व गाडीचा किरकोळ खर्चाची तरतूद करुन तालुका आरोग्य अधिकारी यांनी या गाड्या अधिग्रहण केल्या. चालकाचे मानधन व किरकोळ खर्च देण्याचे मान्य केले होते.या सर्व संस्थाध्यक्षनी बसेस दिल्या.

चार महिने स्वखर्चाने गाड्या पळविल्या. त्यानंतर या बसेस चार ते साडेचार महिन्यांनी परत केल्या. परंतू बस चालकांना या काळातील कामाचा चार महिन्यांचा कसलाही मोबदला दिला नाही. या कार्यकाळत उधरनिर्वाहासाठी कुठूनही मदत झाली नाही. यावर मानधनासाठी शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला. या काळात शाळा देखील बंद आसलेमुळे या चालकांना शाळेकडूनही मदत मिळाली नाही.

----

बसचालकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी (१) , जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हील सर्जन सयांच्याकडे पाठपुरावा केला. कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा देणारे चालक आता आर्थिक विवंचनेत आहेत. परंतू मदत अद्याप नाही.

- अल्ताफ सय्यद

चालक

----

चालकाचे मानधनासाठी जिल्हा पातळीवर सतत पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध होताच चालकाचे मानधन दिले जाईल.

- डॉ. अशोक ढगे

तालुका आरोग्यअधिकारी, बार्शी

Web Title: Corona of school bus drivers in Barshi exhausted the fare of the period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.